अमळनेर (प्रतिनिधी) फलकावरून शहरातील भांडारकर गल्लीत १६ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दोन गटात दगडफेक झाली. यामुळे भीतीदायक वातावरण झाले होते. मात्र घटनास्थळी लागलीच पोलिस पोहचल्याने शांतता झाली.
याबाब अधिक माहिती अशी की, एका पडलेल्या जागेच्या समोर असलेल्या फलकावरून दोन गटात वाद निर्माण झाले. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटातील काही इसम एकमेकांवर विटा दगड फेकत असल्याने मध्ये जाण्यास कोणी धजावत नव्हते. मात्र घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच डी वाय एस पी राकेश जाधव , पोलीस निरीक्षक विजय शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्या सह सुमारे तीस चाळीस पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी जमावावर ताबा मिळवून काही मिनिटात शांतता प्रस्थापित केली. दोन्ही गटाकडून कोणाचीच तक्रार आली नाही म्हणून अखेर पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन पोलीस नाईक सिद्धांत शिसोदे यांनी तक्रार दिली की ते आणि शरद पाटील नाईट पेट्रोलींग करताना त्यांना वाडी चौक परिसरातील भांडारकर डॉ रईस अहमद सत्तार बागवान व योगेश दत्तात्रय येवले रा भांडारकर गल्ली हे दोघे व त्यांच्यासमवेत आणखी काही जण एकमेकांशी झोंबझोंबी करत होते. त्यांनंतर एकमेकांवर दगड फेकायला सुरुवात केली. त्यांनी व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणून शांततेचा भंग केला म्हणून दोघांसह कांहींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.