अरे… ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत, खुद्ध मुख्यमंत्र्यांनी पत्रांची दिली पोहोच पावती !

पाडळसे धरण समितीशी केली चर्चा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

पत्राच्या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी दांडी मारली तरीही आंदोलनाला यश

अमळनेर (प्रतिनिधी) अरे…! ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत.. मला मिळाले ते मंत्रालयात..ते तुम्हीच आहात, असे पाडळसे धरण समितीच्या शिष्टमंडळाला पाहून खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांनी त्यांना ५२५०० पत्रे मिळाल्याची जणू पोहच पावती देत अमळनेकरांच्या भावना समजल्याची कबुली दिली. या प्रश्नात लक्ष घालण्याचे समिती सदस्यांना सांगत लवकरच मुंबईत भेट होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले. त्यामुळे आता धरणाच्या कामाला गती येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण गतीमानतेने पूर्ण करणे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होणेबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची पाडळसे धरण जनआंदोलन समितीने आमदार चिमणराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. ५२ हजार ५०० पत्रे पाठवण्याचा अश्चर्यकारक उल्लेख करीत समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. या भेटीप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,आमदार चिमणराव पाटील,आमदार मंगेश चव्हाण,आमदार चंदुलाल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ आदि उपस्थित होते. या वेळी निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम २६ वर्षांपासून निधीअभावी रखडले आहे. धरण गतिमानतेने पूर्ण व्हावे यासाठी पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,रणजित शिंदे,सुनिल पाटील यांची मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांचेशी चर्चा झाली.धरण गतीमानतेने पूर्ण करणेबाबत समितीतर्फे पाठवण्यात आलेल्या ५२५०० पत्रांचा उल्लेख करीत ना.एकनाथराव शिंदे यांनी पत्र आंदोलनाची दखल घेतल्याचे समितीच्या लक्षात आणून आस्थेवाईपणे चौकशी केली.

मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मांडली वस्तूस्थिती

वेळी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जनआंदोलन समिती सातत्याने आंदोलने करीत आहेत. १९९९ ला भूमिपूजन झालेल्या धरणचे बांधकाम वर्षानुवर्ष रखडल्याने धरणाची किंमत हजारो कोटींच्या घरात पोहचली आहे. या प्रकल्पाला आता केवळ केंद्र सरकारच्या योजनेतूनच आवश्यक असा अपेक्षित निधी मिळू शकतो.म्हणून महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या संबंधित सर्व परवानगी, सुधारीत प्रशासकीय मान्यता तातडीने पूर्ण व्हाव्यात आणि सदर धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा या मागणीसाठी अमळनेर, पारोळा, धरणगाव,चोपडा,धुळे , शिंदखेडा या लाभक्षेत्रातील जनतेकडून सातत्याने आग्रही भूमिका घेतली जात आहे.जनतेत सदर प्रश्नावर कमालीचा असंतोष आहे. जनभावनेचा आदर करून सदर धरण गतीमानतेने पूर्ण व्हावे यासाठी सदर विषयावर संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांचेसह जनआंदोलन समितीच्या सदस्यांची प्रशासकीय बैठकीचे आयोजन व्हावे.शासनातर्फे कालबध्द कार्यक्रम तयार करून निधी उपलब्ध व्हावा ! अशी लेखी मागणी करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मांडले सिचनाचे गणित

तर लाभक्षेत्रातील किती जमिन सिंचनाखाली येईल याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारणा केली असता समितीतर्फे ४३६०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे सांगितले गेले. धरणाच्या लाभक्षेत्रात आपल्या पक्षाचेही ३ आमदार जनतेने निवडून दिलेले आहेत म्हणून जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहेत, असे समितीतर्फे सांगण्यात आले.

लवकरच मुंबईत भेटीचे आश्वासन

यावेळी सदर प्रश्नात लक्ष घालण्याचे समिती सदस्यांना सांगत लवकरच मुंबईत भेट होईल, असे आश्वासन ना.एकनाथराव शिंदे यांनी दिले. याप्रसंगी उपस्थित पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आ.चिमणराव पाटील यांनीही सदर प्रश्नावर मुख्यमंत्री यांना धरणाबाबत माहिती दिली. समितीचे महेश पाटील, रविंद्र पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

टोप्या पाहून गाडी थांबवली

तर मुख्यमंत्री हे आमदार चिमणराव पाटील यांच्या निवास स्थानाबाहेर निघत असताना गेटजवळ जनआंदोलन समितीच्या टोप्या घातलेले पदाधिकारी महेंद्र बोरसे, प्रशांत भदाणे, प्रसाद चौधरी, प्रविण संदानशिव, गोकुळ पाटील यांचेसह अमळनेरचे पत्रकार संजय पाटील, जितेंद्र ठाकूर, महेंद्र रामोशे, आदिंजवळ गाडी थांबवून गाडीची काच उघडून समिती सदस्यांशी धरणा बाबत विचारपूस केली. संवाद साधून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे ऐवढ्या कडक सुरक्षेतही त्यांनी गाडी थांबवून समिती सदस्यांशी संवाद साधल्याने मुख्यमंत्र्यांतील संवेदनशील माणसाचा अनुभव उपस्थितांनी घेतला.

५१ हजार पत्राच्या आंदोलनाल होती दांडी

पाडळसे धरण समितीने ५१ हजार पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून धरणाचा विकास साधण्याचे आवाहन केले. परंतु या ऐवढ्या मोठ्या आंदोलनाला आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, स्मिताताई वाघ, शिरीष चौधरी यांनी दांडी मारली होती.

पाडळसे अमळनेर प्रकल्प ना…

कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी पाडळसे धरणाचा उल्लेख करताना पाडळसे अमळनेर प्रकल्प ना, अशी विचारना केली. त्यांना उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. तो प्रकल्प महत्वाचा आहे. ४८ हजार हेक्टर ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे त्याच्यावर देखील सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही त्यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना दिली. त्यामुळे या प्रकल्पाला आता निश्चितच चालणा मिळेल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Tags: 4014140141401414014140141401414014140141401414014140141401414014140141401414014140141401414014140141401414014140141

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *