वीजबिल वाटपवरून एकास तिघांनी केली मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी) वायरमनकडून बिल घेऊन खासगी वाटप करणाऱ्याने एकाने आणि अ्य दोघांनी एकास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील निंभोरा येथील प्रमोद बापू कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन ते चार महिन्यापूर्वी मका काढताना धुळ मनोहर दगडू धनगर यांच्या घराकडे उडली होती. यावरून त्यांनी वाद उपस्थित केला होता. तो वायरमनकडून इलेक्ट्रीक बिल घेऊन गावात वाटप करतो. १४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजात विजेचे बिल वाटप करीत असताना माझे मोठे भाऊ विनोद बापू कोळी यांनी आमची बिल का देत नाही, असे विचारल्यावर वाद घालून मनोहर दगडू धनगर, विजय दगडू धनगर, कपिल मनोहर धनगर यांनी मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *