मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ निर्णय घेण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र.९ मधील रस्त्यांमुळे नागरिक, व्यापारी बांधव हैराण झाले आहेत.व्यापारी बांधव तथा नागरिकांचा हितार्थ तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा कडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेला सर्वात जास्त कर देणारा भाग हा प्रभाग क्र.9 चा आहे. शहरातील सर्व्या प्रमुख बँक, व्यापारी प्रतिष्ठान, बाजार पेठ असताना नगरपरिषद सोयीने दुर्लक्ष करीत आहे. राणी लक्ष्मी बाई चौक, ते रेल्वे स्टेशन पर्यत रोड, पांच पावली देवी चौक ते विजय फरसाण पर्यंत, बस स्टॅन्ड ते स्टेट बँकपर्यंत रोड वर फिरणे म्हणजे जणू मातीचा खाणीतून फिरत असल्याचा भास होत आहेत. शहरात विविध भागात ठरवून विकास कामे केली जात आहेत. त्या उलट आमचा प्रभागात ठरवून नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे? नागरिकांचा संयमाचा अंत नगरपरिषदेने पाहू नये. आठ दिवसात जर ह्या धुळी ला पायबदं करण्याचा दृष्टीने पावल उचलली नाही व रस्त्यांची दुंरुस्ती केली नाही तर सुस्त व डोळ्याला पट्टी बांधलेल्या परिषदेला जाग आणण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेऊ. त्याच प्रमाणे राणी लक्ष्मी बाई चौक परिसरात सार्वजनिक मुतारी ची व्यवस्था नाही. त्याबाबत देखील तात्काळ निर्णय घ्यावा. तरी तात्काळ नागरी हितार्थ निर्णय घ्यावा ही मागणी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी केली आहे. या पूर्वी देखील जनहितार्थ प्रश्न करिता चौधरी यांनी आगळी वेगळी आंदोलन केली आहेत व नगरपरिषद तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना काम करण्यास भाग पाडले आहे. त्याच प्रमाणे शहरातील काही भागात वर्ष भरा पूर्वी केलेल्या रस्त्यावर भुयारी गटारी चे काम करून रस्त्याचे तीन तेरा वाजवले आहेत.एक प्रकारे सरकारी यंत्रनेकडूनच निधीचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोप देखील चौधरी यांनी केला आहे.