युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ७५ वक्ते व ७५ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्याने देण्याच्या अभियानाला सुरुवात झाली. अमळने शहरातील सर्व शाळा महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जि. एस. हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला.
खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्रा. अशोक पवार व पर्यवेक्षक एस.बी. निकम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी वक्त्या मुक्तमाला पाटील व भाविका सुरेश वाल्हे या विद्यार्थिनींची उत्कृष्ट भाषणे झाली. राष्ट्रीय महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी अभियान सुरू झाले आहे. घरातील प्रत्येकाला किमान एक तरी महापुरुषावर दहा मिनिट बोलता आले पाहिजे. या अभिनव अशा अभियानात विद्यार्थी ,शिक्षकांनी, पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रास्ताविकात प्रा. अशोक पवार यांनी केले. अमित पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन केले. व्यासपीठावर के. पी. पाटील, के. आर. बाविस्कर उपस्थित होते.