❇️चालू घडामोडी ❇️
◆ जी किशन रेड्डी यांनी व्हिझिट इंडिया इअर 2023 उपक्रम सुरू केला.
◆ 2023 साठी भारताचा हज कोटा 1,75,025 निश्चित करण्यात आला.
◆ नागालँड सरकारने पाम तेलाच्या लागवडीसाठी पतंजली फूड्ससोबत सामंजस्य करार केला.
◆ Mobicule द्वारे बँका आणि NBFCs साठी मालमत्ता परत मिळवण्याचे मॉड्यूल लाँच केले आहे.
◆ SpaceX ने $100 दशलक्ष पर्यंतचा NASA करार केला.
◆ Google ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप अँथ्रोपिकमध्ये $300 दशलक्ष गुंतवणूक केली आहे.
◆ फॉक्सकॉन, वेदांत यांनी भारतातील सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी STM सोबत टेक टाय-अप योजना आखली आहे.
◆ सौदी अरेबिया 2027 च्या आशियाई चषकाचे यजमानपद भूषवणार आहे.
◆ MeitY सचिवांनी G20 सायबर सुरक्षा व्यायाम आणि ड्रिलचे उद्घाटन केले.
◆ IBM ने AI तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने पृथ्वीच्या हवामानावर नवीन निष्कर्ष मिळविण्यासाठी NASA सोबत भागीदारी केली आहे.
◆ आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस 04 फेब्रुवारी 2023 रोजी साजरा केल्या जातो.
◆ दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.
◆ NIA ने ‘Pay as You Drive’ (PAYD) पॉलिसी लाँच केली आहे.
आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर
🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
*✳️ राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती ✳️*
🔴 पात्रता :-
🟢भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार
ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
🔵त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.
⚫️त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
🔴ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.
🟢संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.
______________________________________
🔴अपात्रता –
🟢भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार
ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.
🔵ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.
⚫️ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास.
🔴ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.
🟢त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास.
______________________________________
🔴निवडणूक :
🟢राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.
🔵राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.
______________________________________
🔴कार्यकाल :
🟢भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.
🔵राष्ट्रपती पदाची मुदत पाच वर्षाची असली तरी मुदतपूर्व राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो.
🔵याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल अशा परिस्थितीत राष्ट्रपतीवर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालविला जातो व हा महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो.
⚫️एक व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी किमान दोन वेळा निवडणूक लढवू शकते.
______________________________________
🔴 वेतन, भत्ते व सुविधा :
🟢राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्राप्त होते.
🔵त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रपती भवन हे निवासस्थान प्राप्त होते.
⚫️कार्यकालीन कामांसाठी देशी विदेशी प्रवास हा देखील मोफत असतो.
🟢एकदा निश्चित झालेले वेतन कोणी कमी करू शकत नाही.
🔵आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते.
⚫️निवृत्त वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
______________________________________
🟠 राष्ट्रपती चे संविधानीक अधिकार :-
🔴भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे.
🟢भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे.
🔵भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते.
⚫️ यामध्ये केंद्राचा कारभार हा संसदेमार्फत चालतो.
🔴 तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधीमंडळामार्फत चालतो.
⚫️परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे.
🔴भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासन प्रमुख आहेत.
🟢 देशातील सर्व राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो.
🔵संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहिने तयार होत असतो.
⚫️राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात.
🟢या राष्ट्रपतीला 26 जानेवारीच्या दिवशी मनवंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे.
🔵राष्ट्रपती हे पद अतिशय जबाबदारीचे असल्यामुळे राष्ट्रपतीला काही घटनात्मक विशेष अधिकार देखील देण्यात आलेले आहेत.
🔴राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते.
🟢 असे असले तरी भारताचे राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेने सत्तेवर येत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारताचे राष्ट्रपतीपद तयार केलेले नाही.
🔵अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे.
⚫️तर भारतात राष्ट्रपती हे नामधारी शासनप्रमुख आहेत.
🟢भारताच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा ही अतिशय महत्वाची आहे.
🔵भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद तर 11 वे राष्ट्रपती के.आर. नारायणन तर बारावे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.
आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर
🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
🔴भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे :
🟢भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला.
🔵१८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.
⚫️भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले.
🔴प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता.
🔵त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.
🔴मिरात-उल्-अखबार :
>🟢 राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले.
>🔵 लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले.
⚫️> संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.
आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर
🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
🔴 भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली.
🟢 ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत.
🔵 भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले.
🔵 ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते.
⚫️ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता.
🔴 त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली.
🟢 तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.
🔵 मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय.
⚫️ ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.
🔴 मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरोल्ड १७८९ मध्ये सुरु झाले.
🟢 १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले.
🔵 प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता.
⚫️ पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले.
🔴 बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते.
✍️
आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर
🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- जगदीपजी धनखड (14 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमितजी शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथजी सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे )
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मलाजी सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?
उत्तर :- धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांतजी दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले – बिपिंजी रावत
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- अश्र्विन कुमार वैष्णव
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार
16) प्रश्न :- महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा
18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)
19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- विवेक राम चौधरी
20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर. हरिकुमार
━━━━━━━━━━━━━
आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर
🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
❇️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ❇️
❇️ शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे ❇️
◆ कळसूबाई 1646 नगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 नगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर
🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
🛑 खेलो इंडिया युथ गेम्स – 2023 🛑
✅ आवृत्ती – 5 वी
✅ ठिकाण – मध्य प्रदेश
✅ कालावधी – 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023
✅ भारतातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 5000 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
✅ खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये एकुण 161 पदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र प्रथम स्थानी राहीला, हरियाना आणि मध्य प्रदेश क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले.
✅ महाराष्ट्राने 56 सुवर्ण, 55 रौप्य, 50 कांस्य पदकं पटकावली.
आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp वर
🚨चालु घडामोडी महत्वपूर्ण नोट्स । स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन