अमळनेर (प्रतिनिधी) एकाच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार करून दहा वर्षांपासून फरार झालेल्या आरोपीच्या इंदोर येथून अमळनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मनोज देविदास पाटील (वय २३ जुने बसस्थानक) हा १० नोव्हेंबर २०१३ रोजी नाचत असताना कालू उर्फ विशाल दुर्गादास जाधव (रा. गांधलीपुरा) याने तोंडावर ठोसा मारून गळ्यावर , मांडीवर वस्तरा मारून जखमी केले आणि फरार झाला होता. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानन्तर न्यायालयाने त्याला पकड वॉरंट काढले होते. आरोपी नाव बदलवून इंदोर शहरात राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे याना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , पोलीस नाईक मिलिंद भामरे , सूर्यकांत साळुंखे याना इंदोर येथे पाठवले. पोलिसांना रात्री आरोपी कालू इंदोर शहरात फिरताना आढळून आला. तातडीने त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली.