पाडळसरे धरणासाठीचे 52 हजार 500 पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांकडे झाली रवाना

तब्बल सहा तास दीड क्विंटलच्या 52 हजार 500 पोस्टकार्डवर 12 माणसे मारत होते शिक्के

अमळनेर (प्रतिनिधी ) येथील पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या दीड क्विंटल वजनाच्या 52 हजार 500 पोस्टकार्डवर दुसर्‍या दिवशी तब्बल सहा तास, 12 माणसे अमळनेर पोस्ट कार्यालयात शिक्का मरत होते.
अमळनेर तालुक्यातील गेल्या 26 वर्षांपासून रखडलेला जिव्हाळ्याचा पाडळसरे धरणाचा केंद्रीय अर्थसहाय्य अनुदान योजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी अंमळनेर तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर, कामगार यांनी तब्बल 52 हजार 500 पत्र लिहिली या पोस्टाची गुरुवारी बैलगाडीवर मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर ती पोस्टाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. या दीड क्विंटल वजनाच्या 52 हजार 500 पोस्टकार्ड अमळनेर कार्यालयातून सकाळी जळगावकडे रवाना करण्यात आली. सायंकाळी ते मुंबई येथे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. आता या अनोख्या आंदोलनाची सार्‍या महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *