अमळनेर (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील जीवनश्री रक्तपेढ़ीत रक्तदान कार्यक्रमाने सुरवात झाली. त्यानंतर तांबेपुरा भागातील सी.आर. पाटील इंग्लिश मेडिअम स्कूल मधे विविध शासकीय योजना संदर्भात तीन दिवसाचे सुविधा कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्याचा शुभारंभ उपजिल्हाप्रमुख महेश देशमुख व शहरप्रमुख संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तांबेपुरातील ज्येष्व्यक्तीच्या हस्ते शिंदेच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. उपशहरप्रमुख प्रवीण पाटील यांनी सदर कंँपचे आयोजन केले आहे.यात रेशनकार्ड नुतनिकरण,पगाराचा दाखला,जातीचा दाखला,इतर विविध दाखल्यांसंदर्भात सुविधा पुरावल्या जाणार आहे.
गरीब विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप दुपारी अमळनेर तालुक्यातील बहादरवाड़ी येथील जिल्हापरिषद शाळेत गरीब विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप बालासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. बहादरवाड़ीचे सरपंच रामकृष्ण पाटील, उपसरपंच रमेश पाटील, शहर संघटक साखरलाल माळी, उपशहरप्रमुख प्रवीण पाटील,माजी नगरसेवक महेश पाटील, युवा सेनेचे तालुकप्रमुख गुणवंत पाटील शहरप्रमुख भरत पवार, मुख्याध्यापक प्रकाश शिरसाठ बहादरवाडीचे भटू पाटील व इतर ग्रामस्थ हजर होते.
मांडळ येथे महाआरती व महाप्रसाद वाटप
तालुक्यातील मांडळ येथे ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे माजी सभापती डाँ.श्री. दिपक पंढरीनाथ पाटील यांचेकडून गावातील माऊली भजनी मंडळास भजनसाहित्य ठेवण्यासाठी लोखंडी पेटी देण्यात आली. गावातील मारूती मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर या ठिकाणी पुजा करून श्रीफळ वाढविण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांना उदंड आयुष्यासाठी व त्यांच्या हातून महाराष्ट्राचे तसेच गोरगरीब जनतेची सेवा घडो यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी गावातील सरपंच पती श्री.विजय नथ्थु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते डाँ.अशोक हिंमतराव पाटील, विकासो.चे चेअरमन श्री. देविदास पुना कोळी, मा.सरपंच श्री. विनायक पंडीत बडगुजर,मा.पोलीस पाटील श्री.भास्कर चैत्राम पाटील, भाजपा कार्यकर्ते श्री. अनिल फकीरचंद जैन,शिरिषदादा मित्रपरिवार चे खंदे समर्थक श्री. रमेश महादू पाटील, श्री सुरेश दयाराम कोळी,आम आदमी पार्टी चे श्री.स्वप्निल नवल पाटील, तसेच श्री. लोटन तोताराम पाटील, श्री. तानाजी डिगंबर पाटील, श्री. विठ्ठल हिंमत पाटील, श्री. शामराव लक्षमण पाटील, श्री. गुलाब रघुनाथ पाटील, श्री. विश्वास तोताराम पाटील,दीपक वैराळे, माऊली भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री. सिताराम यशवंत कोळी व भजनी मंडळाचे 100 पेक्षा जास्त कार्यकर्ते व इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.