कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला फुस पळवून नेत अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

अमळनेरचा युवकास पोलिसांनी केली अटक, पोस्कोसह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला दिनांक ५ रोजी फूस लावून पळवून नेत अत्याचार करणार्‍या अमळनेर येथील युवकास पोलिसानी अटक केली आहे. त्याच्यावर
मारवड पोलीस ठाण्यात पोस्कोसह अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये विविध आठ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळमसरे येथील अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील १६ वर्षे १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला दिनांक ५ रोजी फूस लावून पळवून नेल्याने मारवड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता , तीन दिवसांत मारवड पोलिसांनी मुलीला शोधून काढले , तीस जळगाव येथील सुधारगृहात रवानगी केली होती , तेथे पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार एपीआय जयेश खलाने यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांनी तपास चक्रे फिरवून पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्याने अमळनेर येथील २० वर्षीय युवकाला ताब्यात घेतले , तपासा अंती आज दिनांक १० रोजी मारवड पोलीस ठाण्यात आरोपी निखिल संतोष चौधरी (वय २०, राहणार बाहेरपुरा अमळनेर) यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांच्या रखवलीतून फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्या प्रकरणी विविध दोन कलमान्वये तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याचे विविध तीन कलम व अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ च्या विविध तीन अशा एकूण आठ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे , त्यास सायंकाळी अमळनेर जिल्हा न्यायालयात हजर केले असता ,न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे , पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *