अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातही खवशी ग्रामपंचायतीतर्फे विधवा परितक्त्यासमवेत हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे होत्या.
खवशी ग्रामपंचायतीतर्फे ८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.सदस्या जयश्री पाटील,ऍड.ललिता पाटील,काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,ऍड.तिलोत्तमा पाटील,वसुंधरा लांडगे,प्रा.अशोक पवार,गौतम मोरे उपस्थित होते. यावेळी प्रतिभा शिंदे यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढा उभारण्याचे आवाहन उपस्थितांना केले,स्त्रियांना विधवा न संबोधता एकल महिला संबोधण्याच्या संकल्पनेचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे तसेच स्त्रिया या परिपूर्ण असून पुरुषांपेक्षा कुठेच कमी नाहीत असे संगीतले.
यावेळी माजी आमदार स्मिता वाघ,ऍड.ललिता पाटील,ऍड.तिलोत्तमा पाटील,वसुंधरा लांडगे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक अरुण देशमुख यांनी केले.यावेळी गावातील आजी माजी सैनिकांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिजाबराव पाटील,प्रकाश काशिनाथ पाटील,प्रकाश फकीरा पाटील,सुरेश धुडकू भिल, भालेराव रतन पाटील,कैलास सूर्यवंशी, बी.के.सूर्यवंशी, रोहिदास कापडे, लोटन पाटील,कान्हू कापडे, सूर्यकांत कापडे, भगवान गोसावी,आनंदा गोसावी,विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन उपशिक्षिका पूनम पवार,प्रसाद कापडे यांनी केले. आभार बी.के.सुर्यवंशी यांनी मानले.