अमळगाव बीएसएनएल कार्यालयातून 30 मिटर कॉपर केबल नेली चोरून

अमळनेर (प्रतिनिधी ) चोरट्याने तालुक्यातील अमळगाव येथील बीएसएनएल कार्यालयातून 15 हजार रुपये किमतीची 30 मीटर कॉपर केबल लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळगांव बीएसनल कार्यालय येथील उपकरणे बंद पडली होती. त्यामुळे टेक्नीशीयन कैलास पवार यांनी पाहणी केली असता बॅटरी ते पॉवर प्लॅट पर्यतची केबल चोरी झाली असल्याचे आढळून आले, बॅटरी पासुन पॉवर प्लँट पर्यत जाणारी डिसी केबलाचे 3 तुकडे प्रत्येकी साधारण 10 मिटर कॉपरची केबल चोरी झाली सदर घटना दि दि.06 रोजी चे रात्री 01.00 ते दि.07 रोजीच्या चे सकाळी 07.45 वाजेच्या सुमारास घडली. चोरट्याने अमळगांव येथील बीएसएनएल कार्यालय येथील एक्झॉस्ट फॅन काढुन त्यावाटे प्रवेश करून वरिल वर्णनाची व किमतीची कॉपरची केबल चोरुन नेली आहे.याबाबत उपमंडळ अभियंता पंकज भगवानदास रायसिंघानी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *