अमळनेर (प्रतिनिधी) पैलाड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय अमळनेर येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, भारतीय संस्कृती,महाराष्ट्रातील संस्कृती, सण-उत्सव व लोककला,शेतकरी नृत्य,सिनेगीतांवरील नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.लहान मुलांची अभिनयक्षमता पाहून पालकांनी देखील उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली.तसेच विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंद घेतला.आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थीनीनी अतिशय उत्साहाने खुप छान छान चविष्ट व चटकदार खाद्य पदार्थ बनवून आणले होते.स्टाॕलची मांडणी,विविध पदार्थाची विक्री,खरेदी व विविध पदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सरचिटणिस डी.डी.पाटील होते.प्रमुख पाहूने अमळनेर न.पा.स्कुल बोर्ड चे सभापती श्री.चेतन राजपुत लाभले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र पाटील , रूपाली ठाकूर , पुनम पारधी,राहूल पाटील व विवेक पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन एम.एस.लाडे यांनी केले. तसेच शाळेतील इ.12 वी चा विद्यार्थी सैय्यद निजामअली हसनअली यांची राज्यस्तरीय कुस्ती व ज्युडो खेळासाठी निवड झाली म्हणून या विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम साठी नरेंद्र संदानशिव , विलास पाटील , रमेश सांळुखे, पराग पाटील, सुनिल भोई व सैय्यद हसनअली उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शाळेचे पर्यवेक्षक डी.एस.पाटील, आर.बी.शेलकर, एम.आर.सोनवणे यांनी सहकार्य केले.