लक्ष्मीच्या रूपाने सून आणली हेलिकॉप्टरने, सासरे नव्हे पापा म्हणत जिंकले सिमरनने !

चॉकलेट डे मनवत आशिषने केले प्रपोज, स्मितहास्य करीत सिमरन झाली अॅपरोज

गोकलानी परिवारचा स्वागताचा जलवा, चंदानी कुटुंबिय ही पाहुणी झाले हळवा

अमळनेर (प्रतिनिधी) सर्वांच्याच नजरा आकाशाकडे भिरभिरणार्‍या… काही क्षणातच हेलिकॉप्टरचा आवाज कानी पडला.. आणि आली आली म्हणत नजरा खाली घेत नाही तोच हेलिकॉप्टरने लँडिंग केल.. आशिषने हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडत वेल काम सिमरन म्हणत तिला चॉकलेट डे ने प्रपोज केले… आणि त्याच हेलिकॉप्टरने पुन्हा आकाशात झेप घेत एका मंदिरावर दोघांनी पुष्पवृष्टी केली… नंतर तिने प्रतिमाच सासर होणार्‍या अमळनेरच्या भूमिवर आपले पहिले पाऊल ठेवत सखाराम महाराजांच्या पुण्य भूमिला तेवढ्याच नम्रतेने वंदन केले… हे दृश्य एखाद्या चित्रपटाचे नव्हे तर अमळनेरातील सरजू शेठ गोकलानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या होणार्‍या सुनेचे केलेले स्वागताचे आहे…
अमळनेर येथील प्रसिद्ध बिल्डर सुरज गोकलानी यांचा मुलगा आशिष याचा विवाह नगर येथील आईस्क्रीम चे उद्योगपती चंदानी परिवाराची सिमरन हिच्याशी 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. यासाठी गुरुवारी हळदीचा कार्यक्रमासाठी सरजू गोकलाणी यांनी आपल्या लाडक्या सुनेला चक्क हेलिकॉप्टर वर आणले आणि जंगी स्वागत केले.
एखादा चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटला ही लाजवेल अशा थाटात सेट उभारून होणाऱ्या सुनबाईला चक्क अहमदनगर हेलिकॉप्टरने आणत तिचे थाटात स्वागत केले. खानदेशात पहिल्यांदाच सुनेचे असे अनोखे आणि जल्लोषात स्वागत करण्यात आल्याने त्याची सार्‍या महाराष्ट्रात जोरदार चर्चा झाली.

असे आणले नववधू सिमरनला

सरजू गोकलाणी यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता खास पुण्याहून हेलिकॉप्टर नगरला पाठवले. तेथून हेलिकॉप्टरने सिमरनला आणि तिच्या नातेवाईकांना घेत अमळनेरच्या दिशेने झेप घेतली. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर १०:४५ वाजता उतरले. नववधुच्या स्वागतासाठी संपूर्ण गोकलानी परिवारासह नातेवाईक प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर जमला होता.

पुन्हा हेलीकॉप्टरने घेतला टेकअप

अमळनेरला हेलिकॉप्टर आल्यावरवर आशिष त्यात बसला आणि पुन्हा हेलीकॉप्टर ने टेकअप घेऊन एका मंदिरावर फुलांचा वर्षाव करून परत प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर उतरले. तेथे फुले अंथरली होती. आशिषने तिला अलगद उतरवत स्वागत केले. यावेळी नृत्याविष्काराणे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात मार्गावर फुग्यांचा सजावट आणि रंगाची उधळण करण्यात येत होती. जणू एखाद्या चित्रपटाची शूटिंग सुरू असल्याचा नजरा उठून दिसत होता.

नववधुच्या गाडीवर स्वतः सासरे झाले चालक

नववधू सिमरनचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर १३ वाहनाच्या ताफ्यासह गोकलानी परिवाराने वधूला घरी नेले. नववधुची गाडी स्वतः सासरे सरजू गोकलानी यांनी चालवली. पुढे आणि मागे काळ्या गाड्या होत्या. मध्ये पांढऱ्या गाड्या होत्या. हा गाड्यांचा ताफा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

मुलगा मुलगी समानतेचा जोडला धागा

सर्वसाधारणपणे लग्न समारंभात वर पक्षाची सरबराई केली जाते. त्यांच्या परिवाराचा मानपान केला जातो. मात्र मुलगा मुलगी समान मानून अद्यापही एकत्र कुटुंबात नांदणाऱ्या गोकलानी परिवाराचे प्रमुख बिल्डर सरजू गोकलाणी यांनी आपल्या सुनेला खऱ्या अर्थाने घरची लक्ष्मी मानून तिला अहमदनगर येथून हेलिकॉप्टर मधून आणले.

माझे सासरे नाहीत वडीलच !

हवाई सफारी करून कसे वाटले, या प्रश्नवर नववधूने आनंद व्यक्त करत हे माझे सासरे नाहीत वडीलच आहेत. असे खबरीलाल शी बोलतांना सांगितले. अशा स्वागताचा कधी विचारही केला नव्हता. प्रत्यक्ष आज घेतलेला अनुभव कायमच स्मरणात राहील. हेलिकॉप्टरच्या खाली उतरताच फुलांचा वर्षाव ,संगीत नृत्य करत वधूवराचे स्वागत करण्यात आले. नववधुचं स्वागत पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकाच गर्दी केली होती. पोलिसांना विशेष बंदोबस्त ठेवावा लागला होता. सुमारे सहा ते सात लाख रुपये फक्त नववधूच्या स्वागतासाठी खर्च करण्यात आले.

तासी १३० ने हवेत त्याचा उडण्याचा वेग

साई इव्हिनेशन मुंबई यांचे हेलिकॉप्टर होते. हेलिकॉप्टरचे कॅप्टन नितीन होते. कॅप्टन विक्रांत चांदवडकर, तंत्रज्ञ ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विष्णु गोतरने, संदीप शिंदे, विहान चांदवडकर, अग्निशामक रुग्णवाहिका सुरक्षा पथक उपस्थित होते. सिमरन सोबत तिचे नातेवाईक त्यात आले. तासी १३० ने हवेत त्याचा उडण्याचा वेग होता. तर हेलिकॉप्टर चे तासी भाडे ८५ हजार असून सारा खर्च अंदाजे सहा ते सात लाख रुपये होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *