खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सेवानिवृत्त सफाई कामगारांना ग्रॅज्युइटी, उपदानाच्या थकीत रकमा एक रकमी अदा मिळाल्याने पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यात आनंद

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिलेला शब्द पाळल्याने कर्मचारी संघटनातर्फे स्वागत

अमळनेर(प्रतिनिधी)येथील नगरपरिषदेतील सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या ग्रॅज्युइटी, उपदान, इत्यादी रकमा गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असताना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी एकरकमी त्या वितरित केल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिलेला शब्द पाळल्याने कर्मचारी संघटनांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या कार्यपद्धतीवर आनंद व्यक्त केला.
मुख्याधिकारी सरोदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना निश्चितच काही ना काही देईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त 46 कर्मचाऱ्यांना सुमारे 76 लाख 47 हजार 167 रुपयाचे धनादेश देऊन बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या रकमा वितरित करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. आजपर्यंत कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या रकमा दिलेल्या नव्हत्या ते काम मुख्याधिकारी सरोदे यांनी केले असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिलेला शब्द पाळल्याने राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघाचे सरचिटणीस अविनाश संदानशिव, अध्यक्ष शकील काझी, भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव, अध्यक्ष प्रसाद शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button