अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली असून यात तांदळी येथील अल्पवयीन मुलगी आणि मारवड येथील २० वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तांदळी येथील अल्पवयीन तरुणी २५ जानेवारी रोजी रात्री बेपत्ता झाली आहे. तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार आईने केल्यावरून मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारवड येथील तरुणी क्रितिका खंडेराव बोरसे (वय २० ) ही २७ रोजी सकाळी साडे आठ वाजता मारवड येथून कॉलेजला जाऊन येते असे सांगून गेली होती. ती सायंकाळपर्यंत परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस दोन्ही घटनांचा शोध घेत आहेत.