नव्याने प्रभाग रचना प्रस्ताव १० फेब्रुवारी पर्यंत मागितल्याने बैठकीचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) आगामी वर्षात होऊ घातलेल्या १४ ग्रामपंचायतीच्या नव्याने प्रभाग रचना प्रस्ताव १० फेब्रुवारी पर्यंत मागवण्यात आले असून त्या संदर्भात ३ रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवकांसह नियुक्त केलेल्या १४ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यात त्यांना प्रभाग रचनेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अमळनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी २३ ते डिसेंबर २३ दरम्यान संपत असल्याने निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करून , आरक्षण याबाबत चा प्रस्ताव १० फेब्रुवारी पर्यंत तयार करण्याचे आदेश निघाले आहेत. १४ ग्रामसेवक आणि १४ तलाठी यांच्यासह १६ प्राधिकृत अधिकाऱ्यांची बैठक ३ रोजी तहसील कार्यालयात होणार आहे. नव्याने प्रभाग रचना करताना आरक्षणसाठी २०११ ची जनगणना,लोकसंख्या विचारात घेऊन गावाच्या नकाशाच्या आधारे भौगोलिक सलगता पाहून हद्द व चतु:सीमा ठरवताना वाड्या , वस्त्या , रस्ते , नाले यांचा ठळक ठिकाणाचा विचारात घ्यावे असे आदेशात म्हटले आहे.
या ग्रामपंचायतीचा आहे समावेश
लोंढवे , अमळगाव, मंगरूळ, मुडी प्र डा या ग्रामपंचायती तर शिरसाळे बु , पिंपळे खुर्द , सडावण बु , रढावण बु , नन्दगाव ग्रुप, मठगव्हाण ग्रुप, दोधवध, भरवस, गोवर्धन, ढेकू सिम या ग्रुप ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.