अमळनेर (प्रतिनिधी) अबुधाबी येथे खान्देशी इन युएई मधील सभासदांनी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन व खान्देशी महोत्सव एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात साजरा केला. यात बालगोपाळाांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा पररधान केल्या होत्या. युएई मधील वेगवेगळ्या इममरातातील 200 हून अधिक खान्देशी एकत्र आले होते. मुलाांसाठी विविध खेळ घेण्यात आले.
त्याांच्यासोबतच मोठ्याांनी मैदानी खेळांचा आनांद लुटला. प्रत्येक जिल्ह्याच्या टीमने खेळाच्या माध्यमातून आपली ओळख सगळ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे आयोजन भूषण चौधरी, महेश जायखेडकर,घनश्याम पाटील, राहुल पाटील, गणेश बोरसे, चांद्रशेखर जाधव, योगेश पगार याांनी केले. फॅशनशोसाठी मोदहनी अमृतकर, पल्लवी अमृतकर, स्वाती भोळे, विविध खेळ व पेंटिंगसाठी कमलेश जगताप, सायली पाटील, दीपाली चौधरी, योगेश गाजरे, योगेश अमृतकर,रजस्रेशन चौधरी, सुचिता भामरे, आमशष भोळे, छाया वायकर, संजय पाटील , चेतन जावळे. भोजन व्यवस्था अमोल भामरे, डीजेसाठी मनोज बागल याांनी आपआपली जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्वांनी मायबोली अहिराणी गाण्याांवर ठेका धरला.