टंचाई आढावा बैठकीत चारा छावणी सुरू करण्याची मागणी.अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात सुमारे ८६ गावांना टंचाई जन्य परिस्थिती असून ७० गावांना टँकर ने पाणी पुरवठा करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून या वर्षी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही टंचाई आढावा बैठकीत पुढे आली.
तालुका पाणी टंचाई आढावा बैठक प्रताप महाविद्यालयाच्या पू सानेगुरुजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती व्यसपीठावर आमदार शिरीष चौधरी,आमदार स्मिता वाघ,प.स.सभापती वजाबाई भिल, माजी सभापती श्याम अहिरे,तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी संदीप वायाळ,प.स.सदस्य विनोद जाधव,प्रविण पाटील,नाटेश्वर पाटील हजर होते.
आमदार शिरीष चौधरी म्हणाले की पांझरा आणि तापी नदी ला सध्या पाणी आल्याने काठावरील विहिरी भरल्या आहेत टँकर च्या खर्चापेक्षा तात्पुरती पाईपलाईन टाकल्यास तो खर्च परवडेल नदी जोड प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून अक्कल- पाड्याचे पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव दिल्याचेही त्यांनी सांगितले काही गावांना पाणी पिण्यायोग्य नाही अशा ठिकाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याची व्यवस्था करा आमदार निधीतून पैसे दिले जातील आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की अधिकारी आमचे ऐकत नाहीत टँकर प्रस्तावावाबत स्थानिक अधिकारी सांगतात की प्रस्ताव जिल्हाधिकारी कडे गेला आहे आणि जिल्हा धिकारी स्थानिक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने प्रस्ताव परत गेल्याचे सांगतात त्यामुळे विलंब होऊन जनता वेठीस धरली जाते अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे पाणी पुरवठा प्रस्तावात दिरंगाई करू नका आणि चारा छावण्या सुरू करण्याचे आश्वासन दिले.गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी इतर गावांना मोफत पाणी पुरवणाऱ्या धावडे,भिलाली,एकलहरे तसेच अल्प दरात पाणी पुरवणाऱ्या अमळनेर नगरपालिका, बंगाली सचिन आमोदकर आदींचे कौतुक केले.
तरवाड्याचे रामकृष्ण पाटील यांनी विहीर अधिग्रहनसाठी परंपरेनुसार ४०० रुपये फार कमी आहेत ते १००० रुपये करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली , जवखेडा येथील पाणी पुरवठा यंत्रणा अपूर्ण असून मांडळ येथून जुनी पाईप लाईन दुरुस्ती करावी अशी मागणी झाली त्यावेळी आमदार स्मिता वाघ यांनी ग्रामसेवकांना पाणी पुरवठा योजनेतील शिल्लक रक्कम त्यासाठी खर्च करण्याच्या सूचना केल्या,सुंदरपट्टी,लोण बु.येथे विहीर खोलीकरर्णाची मागणी करण्यात आली ,बाम्हणे येथे बोअर अधिग्रहण,कचरे धूपी येथे टँकर ची मागणी करण्यात आली झाडी ला टँकर च्या खेपा वाढवण्याची मागणी झाली, भरवस साठी अक्कलपाड्यातून आवर्तन सोडण्याची मागणी झाली, तर तरवाड्याला पाणी पिण्यायोग्य नसल्याने मांडळ येथून पाणी देण्याची मागणी झाली तसेच यावर्षी गुरांची संखया, वाढीव लोक संख्या विचारात घेऊन प्रस्ताव तयार करावेत अशीही मागणी पुढे आली डांगरीचे सरपंच अनिल शिसोदे यांनी सांगितले की वीज कनेक्शन अभावी तात्पुरती योजना बंद आहे वीज कनेक्शन दिल्यास डांगरी गावाहून ५० गावांना पाणी पुरवठा करू शकतो वीज पुरवठ्या अभावी ७ ते ८ गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र या बैठकीस वीज मंडळ अधिकारी गैरहजर होते.
या बैठकीस ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता एल पी हिरे अभियंता डी व्ही बोरसे, एम बी नांद्रे, एस पी मोरे , ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील,माजी अध्यक्ष दिनेश साळुंखे, नितीन सोनवणे,आर डी पाटील, कमलेश निकम,ग्रामविस्तार अधिकारी सोनवणे, पवार सरपंच सुरेश पाटील,राहुल साळुंखे, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील, महेश पाटील ल,सुनील भामरे, हेमंत चौधरी,भूषण जैन यांच्यासह सरपंच,ग्रामसेवसेवक हजर होते.