खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांसाठी आज ३० जानेवारी रोजी मौन पाळून हुतात्मा दिन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील नागरिक विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी आज ३० जानेवारी रोजी मौन (स्तब्धता) पाळुन देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांसाठी हुतात्मा दिन साजरा करून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन अमळनेर नगर परिषदेतर्फे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केलेले आहे.
आपल्या प्राणाचीआहुती देऊन देशासाठी वीर मरण पत्करून हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांसाठी दोन मिनिट मौन (स्तब्धता) पाळून त्यांना संपूर्ण देशभर आदरांजली वाहण्यात येते. त्या अनुषंगाने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक २७ जानेवारी २०२३ चे परिपत्रक नुसार आज ३० जानेवारी सोमवार रोजी महाराष्ट्रात देखील हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. सोमवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिट मौन (स्तब्धता ) पाळुन आपण देखील हुतात्मा दिन पाळावा. यासाठी ३० जानेवारी रोजी आज सकाळी ठीक ११.०० ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ वाजता भोंगा वाजवला जाईल त्यावेळी शहरातील सर्व शासकीय कार्यालये / निम शासकीय/ शैक्षणिक संस्था / विद्यापीठे अधिकारी/कर्मचारी/शिक्षकेतर कर्मचारी /विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिट मौन (स्तब्धता) पाळावी, ठीक ११.०२ मिनिटांनी पुन्हा भोंगा वाजल्यानंतर मौन (स्तब्धता) सोडायची आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन अमळनेर नगरपरिषदेतर्फे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केलेले आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button