खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शिक्षण विभागातर्फे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमास गुरुजी विद्यालयात प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षण विभागातर्फे परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वार्षिक संवादाचा कार्यक्रम साने गुरुजी विद्यालयात आयोजित करण्यात आला. यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हा कार्यक्रम शुक्रवारी अकरा ते बारा या वेळेत वर्गावर्गातून दाखवण्यात आला. कार्यक्रमा आधीच शाळेतील प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलवर सदर कार्यक्रमाची लिंक पाठवण्यात आली होती,त्यानुसार इयत्ता सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल द्वारे हा कार्यक्रम दाखवण्यात आला,दरम्यान पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील निरीक्षकांनी वर्गात सुरू असलेल्या कार्यक्रमांना भेटी देत पाहणी केली. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनींनी विचारलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी यांनी क्रिकेटच्या परिभाषेत विद्यार्थ्यांना उत्तर दिली. त्यामुळे ती विद्यार्थ्यांना अधिक भावली,आणि समजली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button