अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यां साठी पायी मोर्चा निघाला.
खबरीलाल ची बातमी ठरली खरी…
नुकतेच काही दिवसांपूर्वी खबरीलाल ने बेवड्या मास्तरांची बातमी प्रकाशित केल्यानंतर पिंपळे बु. आदिवासी आश्रम शाळेतील फिटाळ मास्तरांच्या विरोधात सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांनी काल सकाळी ६ च्या सुमारास पिंपळे ते यावल पायी मोर्चा काढला.अमळनेर तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथील शाळेत या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना खोलीत कोंडून मारहाण केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी करत घोषणा देत “आमु अख्खा एक शे,” या सरकारचं करायचं काय; खाली डोकं वरती पाय,अशा घोषणा पायी जातांना देत होते.
यामुळे अत्याचारांची परिसीमा शिक्षकांनी गाठल्यामुळेच संतापात २०३ विद्यार्थ्यांनी थेट चोपडाकडे आगेकूच करत पायी मोर्चा यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयावर काढण्यात आला होता.
विद्यार्थ्यांच्या तक्रारी – निवासी शाळा म्हटली कि निवास चांगला हवा. स्वतंत्र असे वसतिगृह नाही. यामुळे हा एक प्रकारचा कोंडवाडाच आहे. याला कसे जगणे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ज्या आदिवासींना त्यांच्या सोयीसुविधांसाठी निधी लागतो त्याचा पुरेपूर लाभ न देता शिक्षकच दारू प्राशन करून रात्रीच्या वेळी मारहाण करतात.आणि मोबाईल फोडून आगीत जाळतात असे तक्रारींचा पाढा वाचला,मात्र प्रत्यक्षात शाळेत त्यांच्या आदिवासी बालकांचा छळच दिसून आला. ज्याठिकाणी गावाचे मुले आहेत. ते एकत्र याच वर्गात उघड्यावर झोपतात. चक्क पेट्या, अंथरूण उघड्यावरच पडलेले असते. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व समस्या जाणून घेतल्या होत्या.
यावल प्रकल्पअधिकारी यांनी पातोंडा येथे विद्यार्थ्यांची घेतली समक्ष भेट…
यावेळी यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आर बी हिवाळे यांनी भेट घेण्यासाठी व चर्चा करण्यासाठी रस्त्यावरील पातोंडा येथे विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. त्यांनी भेट घेऊन निवेदन स्वीकारले व तात्काळ संस्थेला अधीक्षक निलंबनाचे आदेश दिले त्यानंतर विद्यार्थ्यांचे समाधान झाले व मोर्चा परतला यावेळी प्रारंभी नगाव येथे लहान विद्यार्थ्यांना छोट्या वाहनात बसवून अमळनेर पिंपळे शाळेत रवाना केले.यावेळी मोर्चात अजय पावरा, मदन वळवी, रविंद्र वळवी, गोपाल वळवी, प्रकाश पावरा, रविंद्र बारेला, प्रदीप पावरा, राजेंद्र पारधी, सुनिल भिल, रोहीत चौधरी, श्रावण पावरा, भूषण बारेला,सुखदेव पावरा, शरद पावरा, सजन पावरा, दिलबर पावरा, दीपक बारेला,नितीन ठाकूर, राजेश नाईक, भिमसिंग पावरा,तोरणमाळ गृप सहभागी होता.
आर बी हिवाळे एकात्मक आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल –
संस्था व अप्पर प्रकल्प अधिकारी यांनी मोर्चाबाबत माहिती देताच मी स्वतः ही माहिती मिळताच निघालो या आश्रमशाळेचे अधीक्षक यांचे निलंबनाचे आदेश आपण दिले आहेत बाकीच्या शिक्षकांची चौकशी चे आदेश दिले आहेत.व चौकशी अंती कारवाई करण्यात येईल.