अमळनेर – अमळनेर तालुक्यातील बिलखेडे शिवारात शेतातील तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉट सर्किट होऊन सुमारे अडीच लाखाचा मका जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
कन्हेरे येथील रवींद्र पुनमचंद पाटील यांचे बिलखेडे शिवारात ग न ७५/१ हे अडीच हेक्टर शेत असून १४ रोजी त्यांनी शेतातील मका कापून ठेवला होता शेतातूनच वीज मंडळाच्या तारा गेलेल्या असून १५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ताराना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि मक्याने पेट घेतला शेजारील शेतात काम करणारे दिनेश पाटील यांनी रवींद्र पाटील यांना कळवले तोपर्यंत दिनेश पाटील सोबत पिंटू भिल,नानु भिल, माणिक गोलाईत यांनी त्वरित मक्याचा कडबा बाजूला नेल्याने काही क्षेत्रातील चारा वाचवण्यात यश आले अन्यथा संपूर्ण शेतातील मका व चारा जळाला असता आणि शेजारील शेतातील कपाशी व मका जळाला असता रवींद्र पाटील यांचा अडीच लाखाचा मका व चारा जळाला आहे वीज मंडळाचे अभियंता अंकुश सरोदे तलाठी जितेंद्र जोगी , प्रशांत ठाकरे यांनी पंचनामा केला घटनेची माहिती पोलीस व तहसीलदार यांना कळविण्यात आली असून वीज मंडलाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी रवींद्र पाटील सह इतरांनी केली आहे.