खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🌐 *imp माहिती…*

🎯  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि – अहमदनगर.

🎯  महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

🎯 महाराष्ट्राची राजधानी – *मुंबई*

🎯 उपराजधानी – *नागपूर.*

🎯 महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या – 𝟑𝟔

🎯 महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.

🎯 महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

🎯 महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

🎯 महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

🎯 विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

🎯 विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

🎯 महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

🎯 महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

🎯 महाराष्ट्राचे पठार *बेसॉल्ट* या खडकाने बनलेले आहे.

🎯 महाराष्ट्रातील *पश्चिम घाटाला सह्याद्री* म्हणून ओळखतात.

🎯 महाराष्ट्रातील *मुंबई जिल्हा* आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

🎯 महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

🎯 महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

🎯 महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

🎯 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

🎯 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

🎯 भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

🎯 भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

🎯 महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

🎯 महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

🎯 भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

🎯  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

🎯 पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

🎯 गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

🎯 प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

🎯 गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

🎯 जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

🎯 औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

🎯 पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

🎯 महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

🎯 कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

🎯 कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

🎯 विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

🎯 विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

🎯 महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

🎯 विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

🎯 संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि – बुलढाणा येथे आहे.

🎯  संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

🎯 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि – अमरावती येथे आहे.

🎯  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

🎯 ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

🎯 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

🎯 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

🎯 महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि – नाशिक.

🎯 पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

🎯 कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

🎯 आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

🎯 मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

🎯 यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

🎯 महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

🎯 नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

🎯 महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

🎯 शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

🎯 महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

🎯 शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

🎯 ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

🪀 *पोलीस भारतीसह इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी जॉइन करा…खबरीलाल👇🏻*

. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) गव्हात प्रथिनांचे प्रमाण साधारणत: किती टक्के असते ?
– १२ टक्के

🔹२) तांदळातील प्रथिन हे कोणत्या घटकामुळे उत्तम प्रतीचे प्रथिन ठरते ?
– थायमिन

🔸३) गाय, म्हैस, शेळी, रेनडियर यांपैकी कोणाच्या दुधात सगळ्यात कमी स्निग्धांश असतो ?
– गाय

🔹४) जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे?
– यकृत

🔸५) लोहचुंबकाला लोखंड चिकटणे, साखर किंवा मीठ पाण्यात विरघळणे, पाण्याचे बर्फ होणे इत्यादी …. बदलाची उदाहरणे होत.
– भौतिक

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button