जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन दिला इशारा, प्रशासनाने कार्यवाहीचे आश्वासन
अमळनेर (प्रतिनिधी) सात्री गावाच्या पर्यायी रस्त्याला गती मिळत नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत मिळण्यास दिरंगाई होत असल्याने त्यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ता दिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसेच्या जल साठयात ग्रामस्थांना सोबत जल समाधी घेण्याचा इशारा सरपंच महेंद्र शालिग्राम बोरसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
सरपंच बोरसे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने आश्वासन देऊनही अमळनेर तालुक्यातील सात्री गावाच्या पर्यायी रस्त्याला गती मिळत नसल्याने. गृह संपादन प्रस्ताव क्र. २८७/२०१८ सात्री गावठाण संपादनाच्या कामाला गती न मिळता रखडले आहे. पुरपरिस्थीत पर्यायी रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन अद्यापही सहायता निधी मिळालेला नाही.
तसेच पुर्नवसन गावठाण मधील भूखंड वाटप बाबत शासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या प्रस्तावाला मंजुर मिळत नाही. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ व्यस्थीत होवून दि. २६/०१/२०२३ रोजी प्रजाकसत्ता दिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसेच्या जल साठयात ग्रामस्थांना सोबत घेवून जल समाधी घेत आहोत. याची गांर्भियाने दखल घेवून त्वरीत उचित कारवाई करण्यात यावी, अन्यथा याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असा इशारा दिला आहे.
प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
दरम्यान, सरपंच महेंद्र शालिग्राम बोरसे यांनी निवेदन दिल्यानंतर ते अपर जिल्हाधिकारी यांनी स्विकारले. त्यांनी निवेदन घेऊन एक तास सकारात्मक चर्चा देखील केली. त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले, अशी माहिती सरपंच बोरसे यांनी दिली.