अमळनेर (प्रतिनिधी) येथील जैन सोशल ग्रुपतर्फे रविवार दि. 22 रोजी मोफत किडनी आणि मूत्ररोग विकार तपासणी व उपचार शिबिर शहरात आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात धुळे येथील किडनी व मूत्ररोग विकार तज्ञ डॉ.आशिष छाजेड हे उपस्थिती देऊन तपासणी व उपचार करणार आहेत. यात किडनी रोग, प्रोस्टेट, मूत्ररोग, किडनी कॅन्सर, मुतखडा आदी आजारांची तपासणी होणार असून मूतखडासाठी सर्वात आधुनिक उत्तर महाराष्ट्रतील पहिले थुलियम लेसर द्वारे तपासणी होऊन महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत संलग्न हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार मोफत होणार आहेत. विशेष म्हणजे शिबिरात मोफत युरोफ्लोमेट्री चाचणीही केली जाणार आहे. तरी कुणालाही प्रोस्टेट ग्रंथी व किडणी च्या आजाराची वारंवार लघवी होणे,लघवीत जळजळ होणे,वारंवार लघवी अटकल्यासारखी वाटणे,लघवीत जोर लावावा लागणे,लघवी झाल्यावर समाधान न होणे,लघवीत रक्त जाणे,चेहऱ्यावर व पायावर सूज येणे अशी लक्षणे असल्यास त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष दिनेश लोढा,सेक्रेटरी वृषभ पारख, प्रोजेक्ट चेअरमन देवांग शाह,गोकुळ पारख यांनी केले आहे.
येथे होईल शिबीर, नाव नोंदणी करा
हे शिबिर दि 22 रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान भागवत रोड,पोस्ट ऑफिस जवळील सेवा मेडिकल जवळ,अमळनेर येथे होणार आहे. रुग्णांनी आपली नावे अरिहांत मेडिकल, धुळे रोड,पारख मेडिकल,न्यू प्लॉट,सेवा मेडिकल, न्यूप्लॉट,धनश्री मेडिकल, पाच पावली,विजय मेडिकल,भाजी बाजार,आणि रेमंड शोरूम निकुंभ कॉम्प्लेक्स येथे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.