प्रांताधिकारी, तहसीलदारांची पहा कमाल, गोडाऊन घोटाळ्यात हमालांचीही धमाल

  • पुरवठा निरीक्षक, गोडाऊन किपर चलण देणारा, हमाल मुकादम, रेशन दुकानदारंही गोत्यात
  • कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी कोणाचीही खैर करणार नसल्याने महसूल यंत्रणेत खळबळ

अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील गोडाऊन घोटाळ्यामध्ये गोडाऊन किपरच नव्हे तर हमालापासून ते स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी, पुरवठा निरीक्षक, चलण भरणारा कारकून, हमाल मुकादम, रेशन दुकानदार आणि माल घेणारा ठेकेदार हे सारे बरबरटलेले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रथमदर्शनी चौकशीत दिसून आले आहे. यात कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी कोणाचीही खैर करणार नसल्याने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गोडाऊन घोटाळ्यानंतर आता अमळनेरातील गोडाऊन घोटाळा चव्हाट्यावर आला असून त्याला खबरीलालने वाचा फोडली आहे. त्यामुळे बुधवारी या घोटाळ्याचे खबरीलालने वृत्त देताच संपूर्ण जिल्हाच हादरला असून अमळनेर तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयाचेही धाबे दणाणले होते. थेट जिल्ह्यावरून चौकशी सुरू झाल्याने अधिकाऱ्यांसह या यंत्रणेच्या साखळीत असलेले एक एक कळी आता समोर येत आहे. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, असे आता प्रत्येकजण अंग झटकू पाहत आहे, पण ऐवढी वर्ष गरीबांच्या धान्यावर डल्ला मारून स्वतः गब्बर झाल्यावर एकही ढेकर कोणी दिला नाही. मात्र जिल्ह्याला नव्यानेच कडक शिस्तेचे जिल्हाधिकारी रुजू झाल्याने त्यांनी या घोटाळ्यावरच बोट ठेवले आहे, त्यामुळे या यंत्रणेतील भ्रष्टांचारीच्या पोटात किती घाण आहे, हे जिल्हाधिकारी चिरफाड करून पाहणारच असल्याने आणि कारवाईचीही शस्त्रक्रिया ते करणार असल्याने सर्वांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे.

गणेश हमाल संस्थेची लुडबूड

गोडाऊनमध्ये गणेश हमाल संस्थेला काम दिले आहे. परंतु या संस्थेची मुदत संपलेली असतानाही देखील गोडाऊमध्ये कार्यरत आहे. यात सर्व हमाल सदस्य असतात. ते गोडाऊनवर काम करतात. त्यांना या संस्थेकडूनच हमाली मिळते, किती माल आणि किती माल गेला, किती कट्टी मारली, किती माल शिल्लक आहे, याचे चांगले गणित माहिती असते. त्यामुळे मुदत संपलेली असतानाही या संस्थेचा हस्तक्षेप म्हणजे त्यांचाही यात हिस्सा असेल, हे वेगळे सांगायला नको, तसेच येथे काम करताना हमाल फिटनेस पाहिजे, जे संस्थेत आहेत, तेच कामाला आहेत, काय याची अधिकारी तपासणी करतात काय, फिटणेस नाही, दुसरेच काम करीत असल्याचे दिसते. त्यामुळे या संस्थेचीही चौकशी करणे आवश्यक आहे.

हमालापासून प्रांताधिकारीपर्यंत साखळी

धान्य गोडाऊनमधील काळाबाजार रोखण्याची प्रथम जबाबदारी स्थानिक तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांची आहे. परंतु याकडे त्यांचे सोयीस्करित्या दुर्लक्ष झाले आहे, खरेतर तहसीलदार पुरवठा निरीक्षक, चलण देणारा, गोडाऊन किपर, हमाल मापाडी संस्था, हमाल मुकादम, रेशन दुकानदार, चलन पास करणारा कारकून या साखळीत येतात. यावर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांचे नियंत्रण असूनही ते दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे घबाड सापडले आहे, यात त्यांचाही काही वाटा हिस्सा तर नाही ना, अशी शंका आता येऊ लागली आहे. त्यांच्या संमतीशिवाय ऐवढी मोठी झोलझाल होऊच शकत नाही. स्थानिक राहूनही चौकशी करून शकत नाही आणि जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना झोलझाल सापडतो, म्हणून तहसीलदार आणि प्रांत यांची मुकसंमती आहे, असे समजावे का, पुरवठा निरीक्षक काय करतो, आदी प्रश्नही उपस्थित होत आहेत.

तो माल घेणारा ‘wwf’नव्हे तर ‘wwp’

अमळनेरच्या गोडाऊनमध्ये मिळालेला अतिरिक्त धान्यसाठ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याचा खबरीलालने शोध घेतला असता आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एक बडा ठेकेदार हा माल कमी भावात खरेदी करून त्याला पॉलीश करीत तो बाजारभावाप्रमाणे विक्री करतो. हा जिल्ह्यातील ‘wwf’चा पहिलवानच असून तो ‘wwp’ असल्याचे बोलले जात आहे. तर यातून गोडाऊन यंत्रणा आणि त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनाही दरमहा मोठी रक्कम मिळत असल्यानेच हाताची घडी आणि तोंडावर बोट हे अधिकारी ठेवत असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना या ‘wwp’चाही शोध घ्यावा लागणार आहे, जनहितासाठी या ‘wwp’च्या ‘चोपडे’पणाची पुराव्यानिशी कुंडली लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘खबरीलाल’ सुपूर्द करणार आहे.

डॉक्टरही उतरला रेशन गाड्यांच्या ठेक्यात

रेशनचा माल पोहचवण्यासाठी सरकारी गाड्या नाही, खासगी ठेका दिला आहे. नंदुरबारच्या ठेकेदाराने हा ठेका घेतला आहे. त्यानेही अमळनेच्या सब ठेकेदाराला हा ठेका दिला आहे. तर या ठेकेदारानेही एकाला हे सांभाळण्यासाठी दिले आहे. त्याच्या ४ गाड्या अमळनेर गोडाऊनला आहे. या गाड्यातून दुकानदारांना माल वाहतूक केला जातो. याच गाड्यांमधून साठवलेला अवैध रेशनिंगचा माल गोडाऊन किपर च्या आशिर्वादाने लंपास होतो. त्यामुळे कुणालाही भनक लागत नाही की हा माल अवैध आहे की सरकारी. अमळनेरातील कुणाल,सुनील, बबलू, भैय्या यांच्या असलेल्या या गाड्याही तहसीलदार, प्रांत आणि पुरवठा निरीक्षकांनी कधीतरी तपासल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या गाड्यांचा ठेका घेणारा हा चक्क डॉक्टर आहे.

हातकाट्याच्या आडही रेशनिंगचा माल हडप

मार्केटचे लायसन्स काढून हात काट्यावर माल घेऊन शहरातील दगडी दरवाजाजवळ धान्य दुकाने थाटली आहेत. त्यात ते इतर अन्य धान्य खरेदी, विक्री करू शकतात. परंतु या धान्य खरेदी विक्रीच्या आड या दुकानांवरही रेशनिंगचा माल घेतला जातो. थोडा थोडा करून शकडो क्विंटल रेशनचा माल गोळा करून ते गाडीने हा माल जिल्ह्यात व अन्य ठिकाणी रवाना करतात. एक ते दोन दिवसाआड येथून मोठी आयसर रात्री, अपराती आणि पहाटे भरून जाते. ऐवढा गहू आणि तांदूळ तालु्क्यात पिकतो का, जर तालुक्यात तांदूळच पिकत नाही, मग यांच्याकडे ऐवढी आवक कशी होते, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार आणि प्रांत यांनी कधी याची चौकशी केली आहे, हा सर्व भुरटेपणा शहरात सर्रास सुरु असताना तहसीलदार, प्रांताच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे म्हणतात की कानून अंधा है, पण त्यांनी पट्टी बांधलेली असली तरी कानून के हात बडे लंबे होते है, हेही खरे आहे. त्यामुळे याचीही जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येणार आहे.

रेशन दुकानदारही बनवतात येडं

संपूर्ण रेशन वितरणात माल दाबण्याचा प्रकार वरून खालपर्यंत असतो. एका महिन्याचा माल दाबून दुसऱ्या महिन्याचा माल नागरिकांना देतात. यात एका महिन्याला विकतचा आणि दुसऱ्या महिन्याला मोफत माल देतात. माल देताना कार्डधारकाचा थंब घेतला जातो. त्यावेळी मोफतचा माल हातात दिला जातो. आणि थंब उमटला नाही, असे सांगून पुन्हा 10 मिनिटे थांबून एकदा थंब घेतला जातो. तर नागरिकांना कोणत्या महिन्याचा माल आला आहे, हे उमजत नाही. त्यामुळे आधी न मिळालेल्या मालचाही थंब दुकानदार घेऊन घेत असल्याने त्या मालाची दुकानदाराला पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते. एखाद्या सुज्ञ नागरिकाने मागील मालाची चौकशी केली असता, त्याला गोलमाल उत्तर देऊन वेळ मारून नेली जाते. मुळात भरपूर रेशन मिळत असल्याने कोणीही भूके राहत नाही, त्यामुळे नागरिकही फार डोकेमारी करीत नाही, हाच रेशनचा माल बाजारात अशा प्रकारे फिरत राहतो. यात अर्थपूर्ण व्यवहार सुरळीत सुरू असल्याने स्थानिक अधिकारीही सर्व अलबेल असल्याचे दाखवता. परंतु जिल्हाधिकारी अमन मित्तल सारखे कडक अधिकारी आल्याने असे प्रकार उघड होतात, हे तेवढेच खरे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी ही साखळी कशी तोडतात, याकडेही आता लक्ष लागले आहे.

खबरीलालचे जनतेला आवाहन

शासनाकडून दरमहिन्याला मोफत आणि विकतचा माल रेशन दुकानांवर येत आहे. परंतु बहुतांश दुकानदार हे नागरिकांना माल आला नाही, कमीच माल आला आहे, पुढच्या महिन्यात येणार आहे, अशी उडवा उडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांनी तुमचा दुकानदार तुम्हाला तुमचा माल देतो की नाही, याची खात्री करा. तो देत नसेल तर यासंदर्भात थेट तहसीलदारांशी ( ऑफिस ः02587-223055,02587- 223057) संपर्क साधून तक्रार करा, तेही दाद देत नसतील तर प्रांतांकडे तक्रार करा. तेथूनही दखल घेतली गेली नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आता तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन खबरीलालने जनतेला केले आहे.

1 Comment

  1. SEPTEMABER AND OCTOMEBR CH MAL YACH GODAWAN MADUM GAYAB ZALA A AHE YAT SARVWANCHE HAT OLE ZALE AAHTE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *