अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळूला विरोध केल्याने तरुणाचा खून करणाऱ्या तीन संशयीतांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील जयवंत यशवंत कोळी (वय ३६)हा लौकी नाला परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याच्या शेताजवळील नाल्यालगत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मध्ये वाळू भरत असल्याने जयवंत कोळी यांनी विरोध केल्याने त्यांना संशयीत सहा आरोपीनी फावड्याने मारीत त्यांच्या गुप्तागांवर मार देत त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने ते जबर जखमी झाले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मृत जयवंतची पत्नी शुभांगी कोळी हिच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात सहा संशयीत आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपीना कालच मारवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात सागर अशोक कोळी, गोलू उर्फ देवीदास नरेश कोळी, रोहीत बुधा पारधी यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तर अशोक लखा कोळी, विशाल अशोक कोळी, विनोद अशोक कोळी ( सर्व रा. माडंळ) अद्याप फरार असून त्यांच्याही मुसक्या लवकरच आवळू असे पोलिसांनी सांगितले.