अमळनेर (प्रतिनिधी) | तालुक्यातील पाडळसरे येथून जवळच असलेल्या बेटावद (ता. शिंदखेडा) येथील एकाने भिलाली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तो गेल्या २४ तारखेपासून बेपत्ता होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेटावद येथील संजय बाबूलाल भोई (वय ४५) हे गेल्या २४ डिसेंबरपासू बेपत्ता होते. त्याबाबत नरडाना पोलिसांत हरवल्याची नोंद घेण्यात आली होती, तर दिनांक १८ रोजी दुपारी भिलाली येथील मधुकर चैत्राम पाटील यांच्या मालकीच्या शेतात बेवारस मृतदेह तरंगताना दिसून आल्याने पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार सचिन चव्हाण ,पीएसआय विनोद पाटील यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढून नातेवाईकांनी ओळख पाठवली.