अमळनेरात विविध विद्यालय,महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा…

सरस्वती विद्या मंदीरात विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तक भेट देऊन वाचनप्रेरणा दिवस साजरा…अमळनेर(प्रतिनिधी)येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनासह विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तक भेट देऊन वाचनप्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सरोज मोरे यांनी केले.
“विद्यार्थ्यांनी स्वप्न पहावीत व स्वप्न पूर्ण करण्यासाठी जागे रहावे!” असे आवाहन मुख्यध्यापक रणजित शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात केले .
माजी विद्यार्थिनीने केले पुस्तक वाटप..
यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी पूजा रमेश पाटिल हिने विद्यार्थ्यांना दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा परिचयआपल्या मनोगतातून करून दिला. तसेच वाचनप्रेरणा दिवसाचे निमित्ताने स्व:खर्चाने गरजू व हुशार विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने वाचनीय पुस्तकांची भेट ही दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली पवार हिने तर आभार प्रदर्शन अश्विनी पाटील हिने केले.यावेळी उपशिक्षिका सौ.संगिता पाटील, सौ.गीतांजली पाटील, आनंदा पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर , सौ.संध्या ढबु,तसेच कु.नेहा पाटील, मछिद्र शिवदे,मनीषा मोरे,वासंती भोसले, आदि उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी वाचन उपक्रमात सहभाग घेतला.

अमळनेर प्रताप महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा…अमलनेर (प्रतिनिधी)अमळनेर प्रताप महाविद्यालयात भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑटोम्बर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून प्रताप कॉलेज अन्तर्गत राज्यशास्त्र विभागा द्वारे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ एल.एल मोमाया (उप-प्राचार्य व विभाग प्रमुख) हे होते.प्रारंभी डॉ कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी पूजा सुर्यवंशी,हर्षदा सुर्यवंशी,महेश शिंपी,भुषण कोळी,यांच्यासह अनेकांनी अग्नी पंख या ग्रंथा मधील विविध म्हहत्वपूर्ण संदेशाचे वाचन करण्यात आले.
या वेळी डॉ विजय तुन्टे,डॉ संदीप नेरकर यांनी डॉ कलाम यांच्या जिवन व कार्या संबंधी मुलभुत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ एल.एल.मोमाया यांनी डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वा संबंधीची विस्तृत अशी माहिती दिली. प्रस्तुत कार्यक्रमास प्रा.कान्तिलाल वळवी यांच्या सह अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.सी एन मावची यांनी केले.

लोंढवे शाळेत वाचन प्रेरणा,व जागतिक हात धुवा दिन साजरा..अमळनेर (प्रतिनिधी) लोंढवे येथिल स्व.आबासो.एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालय येथे ‘मिसाईलमॅन’ भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ही वाचन केले. तसेच आज जागतिक हात धुवा दिन ही साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना आपले हात रोज कशा पद्धतीने धुवावेत हे प्रात्यक्षित दाखवण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते, तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील यांनी केले, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मिसाईलमॅन’ यांची जयंती वाचन प्रेरणा दिन साजरा…अमळनेर येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे आज १५ ऑक्टोबर रोजी ‘मिसाईलमॅन’ भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. तसेच आज जागतिक हात धुवा दिन ही साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना आपले हात रोज कशा पद्धतीने धुवावेत हे व्हिडिओ च्या साहाय्याने दाखवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *