अमळनेर (प्रतिनिधी) तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था संचलित, लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळातर्फे समाज भगिनींसाठी पतंग महोत्सव व नवपर्णीताचे स्नेहसंमेलन – हळदी कुंकू हा कार्यक्रम झाला.
पतंग मोहोस्तवाच्या उद्घाटन जयश्री अनिल पाटील व हळदी कुंकू मोहस्तवाचे उदघाटन संपदा उन्मेष पाटील व उखाणे, मॅचिंग स्पर्धा उद्घाटन स्मिताताई वाघ याच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वाणी समाजाच्या जेष्ठ समाजासेविका विमलताई नेरकर होत्या. वाणी समाज मंडळाच्या अध्यक्षा प्रा.रंजना देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रस्तविक केले. नेहा तिसे हिने स्वागत गीत सादर केले. आमंत्रित पाहुणे- पतंग महोत्सवाचे उद्घाटक जि.प.सदस्या जयश्रीताई अनिल यांनी मनोगत व्यक्त केले. मनीषा शेंडे, उषा महिंद, मनीषा पिंगळे यांनी बक्षीस वाटप पार पाडले. परीक्षक म्हणून विद्या हजारे व करुणा सोनार यांनी काम पाहिले. भगिनींना हळदीकुंकू, तिळगुळ व वाण देऊन एकमेकांप्रती स्नेहभाव वाढवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना मराठे, कल्पना येवले, शुभांगी महिंद व राजश्री नेरकर यांनी केले.
वाणी समाज महिला मंडळ अध्यक्ष प्रा. रंजना प्रवीण देशमुख आणि कार्यकारी मंडळ यांनी वेगवेगळ्या समित्या नेमून काम सोपे केले. कार्याध्यक्ष भारती रवींद्र कोठावदे, उपाध्यक्ष जयश्री पंकज मराठे, हेमा चंद्रकांत पुरकर, वनश्री अविनाश अमृतकर व कल्पना अरुण येवले, निर्मला अमृतकर, स्वप्नाली अमृकर, सुरेखा सोनजे, विनिता महिंद, ज्योती मराठे, वैशाली सोनजे, मंजू शिरोडे, अनिता अमृतकर, अरुणा अलाई प्रतिभा कसोदेकर, चित्रा तलवारे, अनिता पखाले, चित्रा शिरोडे, उर्मिला नेरकर यांनी सहकार्य केले. ला. वा. पंच मंडळ यांचे कार्यक्रमांस सहकार्य लाभले व दिलीप येवले यांनी परिश्रम घेतले.