- सुरगाणा गोडाऊन कांडसारखी अमळनेरातही झाली पुनरावृत्ती
- गोडाऊन किपरची केली कुंडली जमा, जळगावच्या हेलपाट्यांनी पडतोय खिमा
- जळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी गोडाऊन किपरची सुरू केली चौकशी
अमळनेर (खबरीलाल विशेष) गोरगरीबांच्या धान्यावर थेट धान्य गोडाऊनमधूनच हदळायला सुरुवात होत असल्याचा खळबळजनक प्रकार जिल्हाधिकारी यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात उघड झाला आहे. शेकडो क्विंटल माल या गोडाऊमध्ये आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गोडाऊन किपरची थेट चौकशी लावली आहे. त्यामुळे हा गोडाऊन किपर दोन दिवसापासून जळगाव येते पळत सुटत आहे. त्यांच्या या टोळीत कोण, कोण दरोडेखोर आहेत, याचाही शोध जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. तर त्यांना संरक्षण देणारे प्रांताधिकारी आणि तहसीलदार काय करतात, की तेही यात अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत, हेही जिल्हाधिकाऱ्यांनी तपासल्यास नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील गोडाऊन कांडसारखे मोठे कांड अमळनेरात उघड होईल.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रेशनच्या धान्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊमध्ये तालुक्यातील रेशन दुकानदारांना वितरीत होणारे धान्य दरमहा येते. तर धान्य गोडाऊनची दरमहिन्याला रोटेशन पद्धतीने क्रॉस चेकिंग केली जाते. तहसीलदार आणि प्रांत ही क्रॉस चेकिंग करीत असतात. तर अमळनेर येथील धान्य गोडाऊनच्या क्रास चेकींगसाठी पाचोरा प्रांताधिकारी आले होते. त्यांनी गोडाऊमध्ये सर्व आलबेल सुरू असल्याचा शेरा मारून आपले कर्तव्य दाखवले. मात्र याच गोडाऊनमध्ये काही तरी काळबेरे असल्याचा संशय जिल्हाधिकाऱ्यांना आल्याने त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच विशेष पथकला पाठवून धाड टाकली. यासाठी त्यांनी स्थानिक तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना भनकही लागू दिली नाही. तर पथकाला धान्य गोडाऊनमध्ये शेकडो क्विंटल जास्तीच्या मालाचे घबाळच हाती लागले. ते पाहून पथकही चक्रावले आहे. हा जास्तीचा माल आला कुठून असा प्रश्न त्यांना पडला.
हा जास्तीचा माल येतो कुठूण
पुरवठा धारकाकडून अमळनेर गोडाऊनला माल येतो तेव्हा एका पोत्यात १०० किलो माल असतो. त्या प्रत्येक गहू व तांदूळाच्या पोत्यातून प्रत्येकी २ किलो माल हमाल काढतो आणि गोडाऊनमध्ये तो जमा केला जातो. त्यामुळे संबंधित रेशन दुकानादाराला केवळ एका क्विंटलमध्ये ९८ किलोच माल देतात. हा माल ते कोणाच्या सांगण्यावरून काढता.?, तो नियमानुसार काढला जातो का,? याचीही चौकशी होणे गरजेची आहे.
दप्तर नेले गुंडाळून
जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाला गोडाऊनमध्ये जास्तीचा माल आढळून आल्याने आपल्या पद्धतीने पंचनाम करीत थेट दप्तर गुंडाळून नेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. हे सर्व पाहून जिल्हाधिकारीही अवाक झाले आहेत. जिल्हाधिकारी हे कडक शिस्तीचे असल्याने कोणीही ब्र शब्द काढत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी निश्चितच आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा पंचनामा करून कारवाई करतील आणि लबाडांचे चेहरे उघड करतील. यात कोण, कोण स्थानिक अधिकारी, कमर्चारी घरी जातील, हे काही दिवसाताच समोर येणार आहे. तर चौकशीसाठी गोडाऊन किपर दोन दिवसापासून जळगाव येथे हेलपाटे घालत आहेत.
स्थानिक प्रांताधिकारी, तहसीलदार करताय काय ?
प्रांताधिकारी गोडाऊनच्या समोरच असतात. तर त्यांच्यासह तहसीलदारांना केव्हाही गोडाऊन तपासणीचे अधिकार आहेत. तपासणी करणे अनिवार्य असताना सुद्धा ते काय पाहतात, त्यांचे लक्ष कुठे आहे ?, शंभर किलोमीटरवर बसणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना अवैध साठ्याची भनक लागते. तर स्थानिक प्रांत आणि तहसीलदार काय कारतात, की त्यांचीही यात मुक संमती आहे ?, या साऱ्या गोष्टींची सखोल झाली पाहिजे, हे किती दिवसांपासून किती वर्षापासून सुरू आहे, याची पायमुळे खोदून काढणे आवश्यक आहे.
कारवाई न झाल्यास करू तक्रार
या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई न केल्यास खबरीलाल स्वतः जनहितार्थ विभागीय आयुक्त, संचालक, सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्याकडे तक्रार करणार आहे, तेथूनही न्याय न मिळाल्यास थेट जनहित याचिका दाखल करण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांकडून गोडाऊन किपरची चौकशी सुरू
अमळनेर येथील धान्य गोडाऊनची पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यात आढळलेल्या बाबींवरून गोडाऊन किपरची चौकशी लावण्यात आली आहे.
अमन मित्तल, जिल्हाधिकारी , जळगाव
उद्या वाचा.…
कोण, कोण यंत्रेत कसे सहभगी,
JILHA PURVATHA ADIKARI, TAHSILDAR, PURHAVTHA NIRIKSHAN ADHIKARI, DOWKUN KIPAR, HAMAL, YANCHE SARVANCEH HAT OLE ZALE SHIVAY HE HOT NAHI