मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रास मुख्य परीक्षा नियंत्रक व प्रभारी कुलसचिव यांची भेट

अमळनेर (प्रतिनिधी ) येथील प्रताप महाविद्यालयातील यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रास मुख्य परीक्षा नियंत्रक व प्रभारी कुलसचिव यांची भेट देऊन पाहणी केली. तसेच सुरक्षित परीक्षे संदर्भात समाधान व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्र प्रताप महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान तीनही विभागाचे दोन सत्रात एकूण ९ सेंटरची एकत्रित परिक्षा सुरु आहे. मंगळवारी यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्य परीक्षा नियंत्रण व प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. बी. पी. पाटील व प्रा. एस्.आर. अत्तरदे यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी केंद्र संयोजक प्रा. पराग पी.पाटील यांनी नवनियुक्त प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ.बी.पी.पाटील व प्रा. एस्. आर. अत्तरदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. डॉ. ए. बी. जैन , केंद्रप्रमुख व प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. एम.एस. वाघ , उपप्राचार्य प्रो. डॉ.जे. एस्. गुजराथी ऑफिस सुप्रीटेंडन्स राकेश निळे यांनीही नुकतीच परीक्षा केंद्रात भेट दिली.
परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून केंद्र संयोजक प्रा.पराग पाटील, वरिष्ठ बहिस्थ परिक्षक प्रा. के.वाय.देवरे, सहाय्यक परिक्षक प्रा. किरण पाटील, राजेंद्र गुजराथी काम बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *