अमळनेर (प्रतिनिधी) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इंटरस्कूल ईलोकेशन कॉम्पिटिशन (वक्तृत्व स्पर्धा) झाली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचे पैलू दाखविले.
या स्पर्धेसाठी अमळनेर मधील सर्व शाळांना निमंत्रित करण्यात आले होते. यात विविध शाळांमधील ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य तथा नॅनो तंत्रज्ञ डॉ. एल. ए. पाटील होते. सुरुवातीला सरस्वती माता व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. या वेळी जजेस म्हणून प्रा.डॉ.लीलाधर पाटील आणि इंजि. हर्षल बोरसे होते, कॉम्पिटिशनसाठी पाचवी ते सातवी एक गट (चॅम्प) व आठवी ते दहावी दुसरा गट (स्कॉलर) असे दोन गट करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या भाषण तथा वक्तृत्व करून जजेस ना देखील अवाक केले. मात्र त्यांनी पारदर्शक पणे सूक्ष्म परीक्षण करून विजेत्यांची नावे काढलीत. विजेत्या विद्यार्थ्यांना न्यू व्हिजन स्कूलतर्फे ट्रॉफी, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, स्पर्धेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सुमित्रा झांजोटे यांनी केले. स्कुलचे चेअरमन निलेश लांडगे, अध्यक्ष शितल देशमुख आणि प्राचार्या प्रेरणा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी डॉ. एल. ए. पाटील यांनी आपल्या मनोगतातून अनमोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नवीन एज्युकेशन पॉलिसी नुसार न्यू व्हिजन स्कूल राबवित असलेल्या बॅगलेस डे बद्दल देखील त्यांनी भरभरून कौतुक केले.
हे विद्यार्थी ठरलेत विजेते
लहान गट ः
प्रथम क्रमांक शौर्य जितेंद्र पाटील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक रिया उमेश मनोरे ग्लोबल स्कुल, तृतीय क्रमांक- निधी भावेश पवार न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, प्रथम उत्तेजनार्थ भक्ती रुपेश मकवान,स्वामी विवेकानंद, द्वितीय उत्तेजनार्थ आर्या संदेश पाटील ग्लोबल स्कुल.
मोठा गट ः
प्रथम क्रमांक प्रसन्न हिम्मत चौधरी सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक प्रितेश विकास मगरे पीबीए इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक मृणाल लक्ष्मण पाटील बोहरा इंग्लिश मीडियम स्कूल, प्रथम उत्तेजणार्थ कार्तिक विश्वास पाटील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय उत्तेजनार्थ श्रद्धा तुषार पाटील स्वामी विवेकानंद स्कूल.