अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विठ्ठल नगर भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनवरील व्हॉल्व्हसाठी करण्यात आलेला खड्डा जीवघेणा ठरत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
अमळनेर शहरातील विठ्ठल नगर भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनवरील व्हॉल्व्हसाठी करण्यात आलेला खड्डा रस्त्याच्या वळणावर असल्याने धोकेदायक झाला आहे. वळणावर असलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या वाहनांची चाके फसून तर अनेकदा लहान मुलांची सायकलची चाके अडकून किरकोळ अपघात होत आहेत. पालिकेने या खड्ड्यावर जाळी बसवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.