पालिकेने सुविधा देऊनही नागरिकांच्या अनास्थेमुळे दुरावस्था,शिवाजी गार्डन ग्रुप चा आदर्श घेण्याची गरज.अमळनेर– शहरातील पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील काही खुले भूखंड पालिकेने विकसित करून उद्यानात त्याचे रूपांतर केले असले तरी परिसरातील नागरिकांची अनास्था असल्याने या उद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली असून याठिकाणी उत्कृष्ठ कार्या- मुळे प्रकाश झोतात आलेल्या शिवाजी गार्डन ग्रुप चा आदर्श घेऊन लोकसहभाग देण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.
गेल्या पंचवार्षिक मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा व न.प. सत्ताधा- ऱ्यांनी पिंपळे रोड व ढेकू रोडवर असलेल्या जवळपास सर्व खुल्या भूखंडाना नागरिकांच्या सोयीसाठी व शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी विकसित करून या ठिकाणी वॉल कंपाऊंड, जॉगिंग ट्रॅक,खेळणी,वृक्षारोपण, आदी सुविधा निर्माण केल्या होत्या यामुळे या भूखंडांचे एकप्रकारे उद्यानातच रूपांतर झाले होते,यातील काही भूखंड मोठे तर काही लहान होते,या भूखं- डाच्या लोकार्पणानंतर परिसरातील नागरिकांनी नियमित जॉगिंग व व्यायाम सुरु करून काहि दिवस वृक्षांची निगा व स्वच्छता देखील राखली परंतु हळूहळू नागरिकांच्याच अनास्थेमुळे हे भूखंड दुर्लक्षित होऊन वृक्षांची वाटच लागली आहे,अनेक ठिका- नच्या जॉगिंग ट्रॅकला पायी फिरणाऱ्यांचे पाय देखील लागलेले नाहीत,काही ठिकाणी लोक जॉगिंग ट्रॅक चा वापर करतातही मात्र त्याव्यतिरिक्त कोणतेही योगदान देण्याचे औदार्य दाखवीत नाहीत,काही भूखंड तर अनेक दिवसांपासून तार कंपाऊंड ला कुलूप लावून बंदिस्त झाले असून याठिकाणी काटेरी झुडपे वाढले ली आहेत,एकंदरीत या परिसराचे सौंदर्य वाढविणारे हेच भूखंड आता परिसराच्या सौंदर्यास बाधा ठरू लागली आहेत, या परिस्थितीबाबत परिसरातील नागरिकांना विचारले असता नगर पालिका लक्ष देत नाही असे सहज सांगून ते मोकळे होत असतात मात्र आपणच आपली जबाबदारी विसरलो याचेच भान या मंड- ळींना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे या परिस- रात अधिकारी,नोकरदार वर्ग,राजकीय पदाधिकारी,प्रगतिशील शेतकरी,शिक्षक वृंद,प्राध्यापक,ग्रामसेवक आदी क्षेत्रातील सुज्ञ मंडळींचा रहिवास असून सर्व दृष्ट्या हि मंडळी सक्षम देखील आहे.
शिवाजी गार्डन ग्रुपकडून प्रेरणा घ्यावी..
लोकसहभाग असला तर प्रशासनाचे सहकार्य आणि प्रोत्साहन देखील आवर्जून मिळते याचा अनुभव आपल्या कार्यकुशलतेने प्रकाशझोतात आलेल्या न्यू प्लॉट भागातील शिवाजी गार्डन ग्रुप ने घेतला असून या ग्रुप ने शिवाजी उद्यानाचे संपूर्ण रूपच पालटविले आहे,या ग्रुप मध्ये जवळपास जवळपास शंभर महिला आणि पुरुष सदस्यांचा समावेश असून या मंडळींनी केवळ उद्यानाची निगा व देखभाल दुरुस्ती हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ग्रुप ची निर्मिती केली आहे,यात व्यापारी,डॉक्टर्स, वकील,अधिकारी, नोकरदार वर्ग,शिक्षक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी,व गृहिणींची समावेश आहे,या ग्रुपने जॉगिंग व व्यायामसह गेल्या सहाच महिन्यात नियमित श्रमदान,वृक्षांना रंगकाम,ओपन जिम व खेळण्यांची दुरुस्ती,बंद बोअरिंग सुरु करणे,जवळपास ५०० च्या वर वृक्षारोपण,वृक्ष संवर्धनासाठी संपूर्ण उद्यानात ठिबक सिंचन आदी कामे करून उद्यानाला नवे रुप दिले आहे,एवढेच नव्हे तर अजूनही या ग्रुप चे उद्यानात म्युझिक सिस्टीम,सीसीटीव्ही,विद्युत दिवे आदी कामांचे नियोजन आहे,व यातील बराचसा खर्च गृप सदस्यांनी जमा केलेल्या पैशातून केला जात आहे.
ग्रुपच्या उत्साहामुळे पालिकेचेही योगदान..
शिवाजी गार्डन ग्रुप ने उद्यान ही आपली जवाबदारी समजून जेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साह दाखविला तेवढाच जोरदार प्रतिसाद पालिकेच्या पदाधिकार्यांनी देखील या ग्रुपला दिला,स्वतः माजी कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तर ग्रुप चे प्रचंड कौतुक करत आवश्यक त्या सोइ सुविधा उपलब्ध करून अनेक समस्या दूरकेल्या,नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी सौ शोभा बाविस्कर,न प प्रशासन अधिकारी संजय चौधरी हे देखील नियमित लक्ष घालून आवश्यक ते सहकार्य या ग्रुपला करीत असतात. यामुळे कॉलनी परिसरातील या दुर्लक्षित झालेल्या भूखंड वजा उद्यानांना नवे रूप देण्यासाठी व त्यांचे सौंदर्य खुल- विण्यासाठी तेथील नागरिकांनीही एकत्रित येऊन आपले योगदान देण्याची गरज आज निर्माण झाली आहे.