खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शिक्षण घेतानांच फुलवला व्यवसाय, यशाच्या आनंदाची मिळाली साय

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) शिक्षण घेत असताना तहसील, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका यासारख्या ७५० शासकीय कर्मचाऱ्यांना जितेंद्र भवरीलाल कटारीया यांनी ट्रेनिंग दिले. त्यामुळे अधिक आत्मविश्वास वाढला. सुरुवातीला पैसे कमी मिळाले पण आत्मविश्वास वाढला आणि चांगला व्यवसाय सेट झाल्याचा आनंद असल्याचे ते सांगतात.
जितेंद्र भवरीलाल कटारिया यांचे शिक्षण बीकॉम एमसीएम झाले आहे. आपल्या यशस्वी करिअर विषयी ते सांगतात, माझ्या व्यवसायाला मी जेव्हा एमसीएमचे शिक्षण घेत होतो, त्यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचे काम मला मिळाले. २००६ पासून मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली. बीकॉम झाल्यानंतर भावाने मला सल्ला दिला व मी जळगावला एमसीएम केले. हे शिक्षण घेत असताना मी तहसील, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका यासारख्या ७५० शासकीय कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले. सुरुवातीला मला माझ्या कार्यात पैसा मिळत नसल्याने खूप साऱ्या अडचणी आल्या. परंतु मी त्या अडचणींवर मात करून माझे कार्य करीत राहिलो. परिवारात मोठा भाऊ, आई वडील, पत्नी, एक मुलगी आहे. माझ्या सर्व कार्य करत असताना माझ्या परिवाराचे नेहमी पाठबळ माझ्यासोबत असते. आयुष्यात खूप सारे चांगले वाईट अनुभव अनुभवले असून आतापर्यंत मी करत असलेल्या कामामुळे जी प्रगती मी केली, जो संघर्ष करून आज जो मी काही आहे तो माझ्या स्वतः चांगला अनुभव आहे. कोरोना काळात अमळनेर मधील नगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी नेत्यांसोबत राहून प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासोबत होतो. कोरोना काळ हा खूप भयंकर काळ होता. त्यात मला सुद्धा कोरोना झाला होता, म्हणून असा काळ येऊ नये, अशी इच्छा आहे. माणसाने आयुष्यात सक्सेस होण्यासाठी आपले काम नेहमी प्रामाणिकपणे करून तसेच येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन त्यावर मात केली पाहिजे. एक दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यात सक्सेस होणारच म्हणून नेहमी प्रयत्न करत रहावे, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button