खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अपघाताने खेचली होती जीवाची दोरी, नंतर उद्योग व्यवसायातून घेतली भरारी

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) सुखाचा आणि समाधानाचा संसार आणि व्यवासाय सुरू असताना एका जीवन घेण्या अपघाताने डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. दोन तास गाडीत अडकूनही अशा कठीण प्रसंगात हिंमत न सोडता जीव वाचवला. त्यानंतर स्वतसह कुटुंबाला सावरत डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर घेतले व सप्लायरचा उद्योग सुरू केला आणि या व्यवसातून जीवनात भरारी घेतल्याचा चित्तथरारक अनुभव अरुण पाटील सांगातात.
अरुण पुंडलिक पाटील यांचे शिक्षण दहावी झाले असून मूळगाव कन्हेरे आहे. ते म्हणाले, मी १९८९ मध्ये दुधाच्या व्यवसायाला सुरुवात केली. अहमदाबाद नोकरीसाठी गेलो असता काही कारणास्तव मी परत येऊ स्वतःच्या म्हशी असल्याकारणाने मी दुधाचा व्यवसाय सुरुवात केली. चिंचदेवी मंदिर ट्रस्टचा १९९० पासून अध्यक्ष आहे. श्री छत्रपती पतपेढीचे एक वर्ष चेअरमनपदी २०१७ मध्ये माझी निवड झाली. कुटुंबात पत्नी, मुलगा, सुनबाई आहे. वाईट अनुभव म्हणजे १९९५ साली खूप मोठा अपघात झाला. दुधाच्या गाडीखाली मी दोन तास अडकून पडलो होतो. त्यानंतर मी २०११ साली डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर घेतले व सप्लायरचा उद्योग चालू केला. हा माझा चांगला अनुभव आहे. कोरोना काळात खूप भयंकर होता. मला सुद्धा करून झाला होता. तसेच दोन वर्षे माझा व्यवसाय बंद होता. त्यामुळे खूप मोठे नुकसान सोसावे लागले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button