गंढ भेटणं तर गोड लागस, नही भेटणं तर दुःख वाटसं….बॅनर बंदीचा नारा लावणारेच आज नगरपरिषदेच्या सत्तेत आहेत अन जागोजागी भले मोठे डिजिटल बॅनर रोज झळकत आहेत, इतके भव्य दिव्य व नागरिकांचे जीवाशी खेळणारे हे मोठमोठे होर्डिंग बॅनर दादा आपल्या छाताड्यावर उभे आहेत, कुणाचा जीव घेण्याची वाट पहात आहात? नगरपरिषद प्रशासन का कारवाई करीत नाही? अमळनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बसस्टँड जवळ बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सरकारी रस्त्यांच्या जागेवर लागलेल्या होर्डिंग पासून केवळ २ फुटावर ३४० हॉल्ट ची विद्युत (तार) गेली आहे, बोर्ड लावताना वा हवे च्या झोतात या लोखंडी होर्डिंगला विद्युत वायर लागली तर अनेकांचा जीव जाऊ शकतो, यात अमळनेर नगरपरिषद जरी आर्थिक महसूल चा फायदा पाहत असेल पण नागरिकांचा ही विचार केला पाहीजे. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला होता. यात ४ जण जागीच ठार झाले तर १५ जण जखमी झाले होते. या अपघातात सहा रिक्षा, एक कार व दुचाकींचं नुकसान झालं होते. अचानक आदळलेल्या वजनदार होर्डिंगच्या दणक्यानं यातील काही रिक्षाचा चुराडा झाला. आतील चालक व प्रवाशांना जबर मार लागला होता.
अशीच घटना अमळनेरात घडू शकते किंवा घटना घडण्याची वाट तर बघत नाही ना..? परंतु पर्यावरण व अतिक्रमण चा नारा लावणारे दादा बॅनर च्या विरोधात असतांना अचानक बॅनर वाल्यांनी दादांचे मन परिवर्तन कसे काय केले व कसे झाले..? या कडे दादा जातीने लक्ष देतील तेंव्हा खरे, का दादांना बॅनर वाल्यांकडून खुराक तर सुरू झाला नाही ना..? या भव्य दिव्य मोठं मोठे बॅनर विरोधात नागरिकांची कारवाई ची मागणी होत आहे.