खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कॉलेजातच गिरवले राजकारणाचे धडे, जीवनात संघर्षाचे अनेक सोडवले पाढे

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) कॉलेज जीवनापासूच जयंतराव पाटील यांनी राजकारणात   प्रवेश केला. त्यानतर विविध पदांवर काम करीत अनेक अडचणी आल्या. प्रामाणिकपणे काम करीत असताना संघर्षही करावा लागला. परंतु न डगमगता आपले काम सुरूच ठेवले आहे, म्हणूनच आज त्यांच्याकडे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जात आहे.
आपल्या जीवन संघार्षाविषयी जयंतराव मन्साराम पाटील सांगतात, शिक्षण बीए झाले. मुळगाव मारवड आहे. मी प्रताप कॉलेजमध्ये असताना १९७२ सालापासून राजकीय कार्याला सुरुवात केली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३६ वर्षे नोकरी केली व २०१२ मध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे. माझे वडील नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या कार्यातून मला प्रेरणा मिळाली. तसेच सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य होतो. त्यानंतर सोसायटीचा सदस्य होतो. जळगाव जिल्हा संस्था चालक संघटनेचा २०२१ मध्ये मी अध्यक्ष आहे. मराठा समाजामध्ये वीस वर्षापासून मी अध्यक्ष आहे. मराठा समाज शिक्षण संस्थांमध्ये १९७२-७३ मध्ये युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष होतो. त्यावेळपासून मी या राजकीय क्षेत्रात माझे काम करत आहे. प्रामाणिकपणे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. परंतु त्याच्यावर मात करून मी माझे कार्य सुरू ठेवले. कुटुंबात दोन भाऊ, पत्नी आहे. तसेच मला मुलगा नाही. पत्नी प्रभावती पाटील हे जिल्हा परिषद सदस्य होते. तसेच मार्केट कमिटीमध्ये पहिल्या महिला संचालिका होत्या. परिवारातील प्रत्येक कार्यात मला पाठिंबा असतो. शिक्षण संस्थेमध्ये मी अध्यक्ष आहे. तसेच संस्थेमधील काही लोक माझ्यावर खोटे आरोप लावून माझ्यावर आक्षेप घेतला. माझे चांगले कार्य त्यांना सहन होत नाही. त्यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला. हा माझा खूप वाईट अनुभव आहे. कोरोना काळामध्ये माझा परिवारात सर्वच जण कोरोना पॉझिटिव्ह होतो. मला त्यावेळी कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे  समाजातील लोकांसाठी मी मदतीसाठी उभा होतो. कोरोना काळात खूप जवळचे मित्र तसेच काही कार्यकर्ते गेले. ते या जगात नाहीत. त्यासाठी खूप दुःख होते, असा भयंकर काळ त्यावेळी होता. मला असं वाटते की जो माहितीचा अधिकार कायदा आहे, त्याचा काही लोक दुरुपयोग करतात. त्यासाठी शासनाने अशा गोष्टींची दक्षतापूर्वक बदल करणे अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button