अमळनेर (प्रतिनिधी) अर्पण संस्थे मार्फत बाल लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांसाठी सोमवारपासून प्रशिक्षण मोहिम सुरू झाली आहे. अमळनेर येथे रोटरी हॉल येथे हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यात अमळनेर शहर आणि तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत.
या प्रशिक्षणातून ‘बाल लैंगिक शोषणास’ प्रतिबंध करणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १४ जानेवारी पर्यंत हे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. जवळपास ४ हजार ८०० शिक्षक या प्रशिक्षनाचा लाभ घेत आहेत. या प्रशिक्षण वर्गात बाल लैंगिक शोषण कसे होते, मूल आणि मुलांचे अधिकार, बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार, पोक्सो कायदा आणि तरतूदी या बाबत सविस्तर चर्चा केली जात आहे. या प्रशिक्षणासाठी अर्पण संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक श्रद्धा जाधव, कोमल मधे मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षण वर्गाला गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख शरद पाटील, भगवान पाटील यांनी मार्गदर्शन केले.