खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जोगेश्वरीच्या कृपेने ज्ञानाचा पेटवला दिवा, नवलनगर परिसरात त्यांच्याच कार्याची हवा

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) समाजातील गोरगरीब तळागाळातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात यावेत यासाठी मनोज पाटील यांनी जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी नवनगर तालुका जिल्हा धुळे या संस्थेची स्थापना करून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. शिक्षणाचा उत्तम दर्जा आणि समाजसेवेचा वसा घेतल्याने त्यांनी पेटवलेल्या ज्ञान दानाच्या दिव्याने अनेकांचे जीवन उजळून निघत आहे.
मनोज रामकृष्ण पाटील नरडाणा येथील मूळ रहिाशी आहे. ते सांगतात, छत्रपती शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून व कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणाबद्दलची तळमळ बघून समाजातील गोरगरीब तळागाळातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात यावेत यासाठी जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी नवलनगर तालुका जिल्हा धुळे या संस्थेची स्थापना करून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. शिक्षणामुळे उत्तम नागरिक घडतात व देशाचे उज्वल भविष्य हे शिक्षणामुळेच होऊ शकते, हे ज्ञात असल्यामुळे हे शिक्षण क्षेत्र निवडले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे ही प्रेरणा मिळाली. कुटुंबात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते त्याप्रमाणे कामाच्या व्यवस्थेमुळे कुटुंबाला कमीच वेळ दिला जातो. परंतु पत्नी कुटुंबाकडे पूर्ण वेळ लक्ष देत आहेत. वेळोवेळी आई-वडील व मोठा भाऊ पण पूर्ण जबाबदारी सांभाळतात ,म्हणून मला सामाजिक शैक्षणिक कामे करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो व भक्कम अशी कुटुंबाची साथ मला मिळाले आहेत. कोरोना काळाचा विचार करता बरेच काही शिकून गेलेला आहे. जवळचे परके झाले, मला स्वतःला कोरोना झाला होता. परंतु प्रबळ इच्छाशक्ती, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या प्रार्थनेमुळे बरा झालो. कोरोना कालावधीत गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच ज्या रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नव्हते, त्या रुग्णांना बेड मिळवून दिला. तसेच काही गरजूंना आर्थिक मदत केली. कोरोना काळात शासनाने ज्या अटी व विविध निर्बंध घालून दिले होते, त्या नियमांचे काटकोन पणे पालन करण्याचा प्रयत्न केला. भारताला नेहमी सहिष्ण देश म्हणून संपूर्ण जगात ओळख आहे ,परंतु अलीकडच्या काळात काही समाज विवाह शक्तींनी समाजात विष पेरण्याचे काम सुरू केले आहेत. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. तसेच सध्या राहुल गांधीजी भारत जवळ यात्रा सुरू आहे. त्यासंबंधीचा संदेश भारतातील तळागाळातपर्यंत तसेच समाजा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे राजकारणात संधी मिळाली तर तिचे नक्कीच सोने करेल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button