अमळनेर (वर्धापन दिन विशेष) विद्यार्थ्यांना कमी गुण असतानाही विविध शहरात रोजगार कसा उपलब्ध करता येईल, यासाठी प्राचार्य कुणाल पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणूनच ते शिक्षण क्षेत्रात भरीव कामाचे महामेरू ठरले असून तरुणांना रोजगार देणारे महागुरू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
प्राचार्य कुणाल पाटील यांच्या जीवनात डोकाऊन पाहिल्यास मोठे व्हिजन त्यांच्यात ओतप्रोत भरल आहे. त्यांनी आजोबा नानासाहेब गुलाबराव आधार पाटील यांच्यापासून संस्काराचे धडे घेतले. आजोबा जवखेडाचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक होते. वडील राजेंद्र पाटील शेती व्यापार करीत सांभाळत आहेत. मुले पारंपारिक इंजिनिअरिंग, मेडिकल आधी कोर्सेससाठी प्रयत्न करतात. आणि जर त्यात अयशस्वी झाले तर त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. म्हणून विद्यार्थ्यांना कमी गुण असतानाही विविध शहरात रोजगार कसा उपलब्ध करता येईल, यासाठी प्राचार्य कुणाल पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, स्व. बापूसाहेब उद्धव उदय वाघ, आमदार कुणाल पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. मयुरी जोशी, तिलोत्तमाताई पाटील यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला आहे. त्यांची पत्नी चेतना पाटील या उच्च शिक्षित इंटिरियर डिझायनर असून त्यांची सहकार्य कुणाल पाटील यांना मिळत असते. कुणाल पाटील यांनी माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निकचे प्राचार्य पदाची धुरा सांभाळल्यानंतर महाविद्यालयाकडे जातीने लक्ष दिले आहे. त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत शिवछत्रपती कौशल्य विकास केंद्र कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी अमळनेर येथे सुरू केले आहेत. या शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. कौशल्य विकास योजनेअंतर्गत वेल्डर, सोपा मेकिंग, शाम्पू मेकिंग, फिनाईल, मेकिंग सर्वर, असे विविध कोर्स शिकवले जातात. त्यातून विद्यार्थ्यांना स्वतः व्यवसाय सुरू करू शकतात. लघु उद्योजक बनवू शकतात किंवा मोठ्या उद्योगात रोजगार मिळू शकतात. एक ना अनेक संधी कुणाल पाटील यांनी तरुणांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. १०१७ ते १९१८ पासून शिवशक्ती प्रायव्हेट आयटीआयचे ते संचालक म्हणून काम पाहत आहेत. आयटीआयच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियन, फिटर अशा कोर्सेसला शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. त्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध केलेल्या आहेत. कुणाल पाटील हे सर्वात कमी वयाचे प्राचार्य आहेत. त्यांचा मनमिळाव स्वभाव, दूरदृष्टी समस्येची दृष्टिकोन समाजासाठी काहीतरी करण्याचे वृत्तीमुळे त्यांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाच्या संचालक डॉक्टर विजय मोहितकर, सचिव डॉक्टर महेंद्रजीत लांगे, नासिक विभागाचे सहसंचालक डॉक्टर पी. पी. नाठे, औरंगाबाद विभागाचे उपसचिव अक्षय जोशी, विकास अधिकारी देवेंद्र दंडगव्हाण जे नेहमीच सहकार्य मार्गदर्शन तसेच विशेष प्रेम मिळत आहेत. म्हणूनच त्यांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या विविध समित्यांवर संधी देण्यात आलेली आहे. त्यांनी परीक्षा नियंत्रक मराठी पथक अकॅडमी मॅनेज मॉनिटरिंग कमिटी अशा समित्याने उल्लेखनी कामगिरी केले आहे. त्यांनी पूर्वी जामनेर येथील सुरेशचंद्र धारीवाल पॉलटेक्निकला उपप्राचार्य म्हणून काम केले आहे. तसेच सुप्रसिद्ध बॉस कंपनीतही अभियंता म्हणून काम केले आहे. यासोबतच त्यांना इतरही सामाजिक कार्याची आवड आहे. सिंधू प्रतिष्ठान धुळे ची सचिव म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या कठीण काळात लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी मदत केल्याचे समाधान आहे.