संकटांना संधी समजून केली मात, त्यांच्या कार्याचीच आहे न्यारी बात

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) व्यवसाय आणि समाजसेवा करीत असताना अनेक अडचणी आणि संकट येत गेली. त्यांना न डगमगता एक संधी समजून त्यावर मात करीत गेल्याने आज चांगले वैभव निर्माण करता आले. म्हणून समाजासह कुटुंबाकडून नेहमीच साथ मिळाल्याचे भूषण आत्मराम बडगुजरांनी सांगितले.
भूषण बडगुजर यांनी आपल्या कार्याचा जीवनपट उलगडताना सांगितले की, मी माझ्या व्यवसायाची सुरुवात मागील पंधरा वर्षापासून केली आहे. व्यवसायाची प्रेरणा ही माझ्या वडिलांपासून मिळाली. पुढे माझा व्यवसाय चांगलाच बहरत गेला. मी माझे काम प्रामाणिकपणाने करीत असल्याने चांगल्या पद्धतीने सुरू आहे. नवनवीन व्यवसाय करत असताना छोट्या-मोठ्या अडचणी आल्यात. पण त्यांना न घाबरता त्या अडचणींवर मात केली. आणि आपले कार्यपुढे चालूच ठेवले. म्हणून आज मी माझ्या व्यवसायात निश्चितच होणे यशस्वी आणि समाधानी आहे. परिवारात आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेत. माझ्या प्रत्येक कार्यात परिवाराचा खूप मोठा मुलाचा वाटा असतो. मित्रपरिवार नेहमीच माझ्यासोबत असतो. त्यांचे वेळोवेळी प्रोत्सानात्मक पाठबळही मला मिळत असते. कोरोना काळाचा विचार करता माझ्या घराजवळील परिसरातील गोरगरीब जनतेला मी स्वतः कोरोना झालेल्या पेशंटांना रुग्णालयापर्यंत घेऊन दाखल केले. त्यांच्यावर काळजीने उपचार करण्याची विनंती ही डॉक्टरांना केली. त्यामुळे ज्या ज्या कुटुंबांना मी मदत केली त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आज मनाला मोठे समाधान देऊन जातो. करोना काळात मी स्वतः खर्चातून माझ्या परिसरात सॅनिटायझरची फवारणी केली. निर्जंतूक परिसर केल्यामुळे फार कोरोनाचा शिरकाव झाला नाही, हेच मोठे काम केल्याचे समाधान आजही मला वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *