दुसऱ्या गटातर्फे ठराव मंजूर..अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर, १० रोजी च्या जळगाव येथील भाजपा विस्तृत बैठकीला भाजपचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष श्री.डॉ.बी.एस. पाटील है कार्यकर्त्यांमध्ये कायम निमंत्रित सदस्य म्हणून हजर होते.
बैठकीत त्यांना पाहून जिल्हाध्यक्ष उदय वाघांनी सूचना केली कि, ज्यांना आमंत्रणे नाही, त्यांनी येथून निघून जावे. त्यानुसार डॉ.पाटलांनी मला निमंत्रण नाही असे सांगून सभात्याग केला. त्यांना थांबवण्याचा कोणीही जिल्हा पदाधिकारी किंवा आपल्या मतदार संघाचे खासदार ए.टी.पाटील यांनी सुद्धा प्रयत्न केला नाही. अमळनेर येथील गांजा प्रकरणात उदय वाघांनी दहा
लाख रुपयांची लाच घेतली त्या आरोपावरून डॉ. पाटलांनी त्यांचे निर्दोषत्व सिध्द होई पर्यंत पदत्याग करावा अशी मागणी केली होती,तो आकस मनात ठेवून वाघांनी है उद्दामपणाचे अशोभनीय कृत्य केले आहे. आपल्या अमळनेर तालुक्यातील पंधरा वर्षे आमदार आणि जिल्हाध्यक्ष राहिलेल्या जेष्ठ नेत्याला अशा प्रकारची वागणूक देणे जिल्हाध्यक्ष वाघांचा आम्ही अमळनेरचे भाजपा कार्यकर्ते तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. आणि त्यांच्या अनेक तक्रारी करून देखील आजपर्यंत प्रदेश पातळी वरून कारवाई झाली नाही. म्हणून पदाधिकारी, कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत. असे पत्र दुसऱ्या भाजप गटाने दिले असून याबाबत प्रदेश भाजप संघटनमंत्री विजयराव पुराणिक प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना दिले असून पत्रावर माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, लालचंद सैनानी, शाम-दास लुल्ला,डॉ संजय शहा,मोतीराम हिंदुजा,प्रीतपालसिंग बग्गा, बी.आर.परदेशी,दिनेश माळी यांच्यासह अनेक भाजप कार्य- कर्त्यांच्या सह्या आहेत.