खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तिसऱ्या वर्धापनदिनी ‘खबरीलाल’वर गुलाब्या थंडीत शुभेच्छांचा झाला वर्षाव

अमळनेर, धुळे, जळगाव, मुंबईसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

अमळनेर (प्रतिनिधी) सायंकाळच्या गुलाबी थंडीची झुळूक अन् सनई चौघडांचा मंद सुरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात खबरीलालचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी हजेरी वालून खबरीलावल शुभेच्छांचा वर्षाव केला. खबरीलालचे संपादक जितेंद्र ठाकूर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
अमळनेरात क्रमां १चे न्यूज पोर्टल ठरलेल्या खबरीलालचा ६ जानेवारी जागतिक पत्रकार दिनी तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या हास्स्य कविसंमेलनाही हजारो रसिकांनी हजेरी लावत पोटभरून हसण्याचा आनंद लुटला. सुरुवातील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापजून करून अभिवादन करण्यात आले.. या वेळी आमदार अनिल पाटील, आमदार सुधिर तांबे,माजी आमदार स्मिताताई वाघ, धुळे येथील अँटीकरेप्शनचे डीवायएसपी अनिल बडगुजर माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, धुळे समाज कल्याण अधिकारी मनिष पवार, जळगांव पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, तहसीलदार मिलिंद वाघ मुख्यधिकारी प्रशांत सरोदे, रत्नदीप सिसोदिया, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, खान्देश शिक्षण मंडळ चेअरमन हरी वाणी , अशोक पाटील, माजी जिप सदस्य जयश्री पाटील, जयवंतराव पाटील, गोकुळ बोरसे, डॉ अविनाश जोशी, डॉ प्रकाश ताडे, डॉ भूषण पाटील,डॉ अनिल शिंदे, धुळे जिप माजी सदस्य के डी पाटील आदी मान्यवरांनी हजेरी लावली.

मान्यवरांकडून खबरीलालचे कौतुक

कोरोनानंतर खबरीलालने आपला तिसरा वर्धापन दिन साजरा करताना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या यशस्वी जीवनगाथा प्रकाशित केल्या.अद्याप कोणीही असा प्रयोग न राबवल्याने प्रथमच खबरीलालने असा आगळा वेगळा प्रयोग राबवून त्यांचे कार्य समाजासमोर आणले. यातून अनेकांना प्रेरणा मिळाली, या प्रयोगाचे कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांनी आवर्जून कौतुक केले.

परदेशातील वाचकांनीही दिल्या व्हॉट्सअॅप अन् मेसेजने शुभेच्छा

खबरीललाच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला. ज्यांना कार्यक्रमाला येणे शक्य झाले नाही, अशा वाचक, हितचिंतकांनी व्हॉटसअॅप, मेसेजने शुभेच्छा पाठवल्या. ऐवढेच नव्हे तर स्कॉटलँड, दुबई, अमेरिका आदी देशातील आपल्या मायभूमितील वाचकांनी थेट व्हिडिओ, व्हॉटसअॅप आणि मेसेजने शुभेच्छा पाठवून खबरीलाल प्रति आपले प्रेमभावना दाखवल्या.

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे गौरव

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी महाराष्ट्र पत्रकार संघाचा उत्कृष्ट वेब पोर्टल संपादक पुरस्काराने खबरीलालचे संपादक जितेंद्र ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर, राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर आणि राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर आर. महाजन यांनी हा गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button