संस्थेकडूनच मिळतेय रोजगाराची हमी,अनेकांचा रोजगार सुरु,जास्तीत जास्त विद्यार्थी व महिलांनी लाभ घ्यावा-आ शिरीष चौधरी..अमळनेर(प्रतिनिधी) झेप फाऊंडेशन अंतर्गत JSWE च्या माध्यमातून शहरी भागातील सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत येणारे होतकरु विद्यार्थी व महिला वर्गास भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध रोजगाराभिमुख कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जात आहे,विशेष म्हणजे या कोर्स नंतर संबधित संस्थाच रोजगाराची हमी देत असून आतापर्यंत प्रशिक्षित झालेल्या अनेकाना मुंबई,पुणे,नाशिक येथे हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे.अजून जास्तीत जास्त विद्यार्थी,युवक व महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ शिरीष चौधरी यांनी केले आहे.
सदर योजनेंतर्गत टॅली Erp-9 (GST सहित),
वेब डिझायनीग, डी टी पी, फॅशन डिझायनीग ट्रॅडिशनल इमरॉड्री,ब्युटी थेरपी आणि हैयर स्टाईलीग लेव्हल,
या कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.विशेष म्हणजे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यात कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाहीत.मात्र या कोर्सेससाठी शिक्षण किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आवश्यक असलेले कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला वार्डातील नगरसेवक सहिचा,रेशन कार्डाची छायांकित प्रत,आधार कार्डची छायांकित प्रत,सुवर्ण जयंती योजनेत कुटुंबाचा समावेश असलेबाबत न.पा. चा दाखला किंवा नंबर,दोन पासपोर्ट साईज फोटो, आदी कागदपत्रे आवश्यक आहेत व वयाची अट १६ ते ४५,वर्ष आहे,तसेच प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधितास मुंबई,पुणे येथे नोकरी दिली जाणार असून किमान वेतन १० ते २० हजारांच्या दरम्यान असणार आहे.व आपल्या कार्यकुशलतेने वेतन वाढत राहणार आहे.ज्या इच्छुकांना हा कोर्स करण्याची इच्छा असेल त्यांनी वरील कागदपत्रासह झेप फाऊंडेशन शाळा नं 5 पवन चौक, कुंटे रोड अमळनेर येथे संपर्क साधायचा आहे,तसेच माहितीसाठी ७५०६७०५३९८ या मोबाईल वर संपर्क साधू शकतात.
दरम्यान आ शिरीष चौधरी यांनी निवडणुकीत जनतेला वचन देताना शेताला पाण्यासोबत हाताला काम देण्याची ग्वाही दिली होती,त्याचीच अश्वासनपूर्ती या झेप फाऊंडेशन च्या माध्यमातून होताना दिसत आहे.आपल्या परिसरात बेरोजगारीचे प्रमाण अधिक असून संबंधितांना रोजगार देण्याची इच्छा असली तरी काहींमध्ये तसे कोणतेही स्किल (प्रशिक्षण) नसल्याने रोजगार उपलब्दतेची अडचण निर्माण होत असते,यासाठीच आ चौधरींनी प्रथम तरुण व महिलांना प्रशिक्षित करण्याचाच उद्देश डोळ्या -समोर ठेवला असून यामुळे रोजगार मिळवून देणे सोयीचे ठरत आहे.