बँकेतून पैसे लांबवणारा दुबे भामट्याच्या मध्यप्रदेश पोलिसांनी अमळनेरात आवळल्या मुसक्या…

बिहारी दुबे ने सुज्ञ लोकांना डुबवले…अमळनेर (प्रतिनिधी) देशातील आंतरराज्यात ठिकठिकाणी सराईतपणे सलगी वाढवून त्याच्याच बँक अकाऊंट मधील पैसे लांबवत गंडा घालणारा हा भामटा अमळनेर शहरात गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास होता यामुळे खळबळ उडाली आहे.
अमळनेर येथील शिरुड नाका परिसरातील शिव कॉलनीत हा सुनील दुबे नामक वय ३० उत्तर प्रदेशातील मिर्झापुर येथील तरुण याठिकाणी १५ हजार रुपये मोजून भाड्याने वास्तव्यास होता याठिकाणी तो केवळ ८ वी शिकलेला हा कामगार कंत्राटदार असल्याचे रहिवाशांना सांगत होता महिन्यात तो २० दिवस बाहेर राहत असे याकाळात तो विमानासह रेल्वेच्या ए.सी. मधून प्रवास करायचा त्याची राहनीमान फौजी सारखी असल्याने या दरम्यान कुणी फौजी भेटला तर त्याच्याशी दोस्ती जमवून त्याच्याशी सलगी वाढवत असे व गोड गोड बोलून माझे ए.टी.एम. खराब आहे तुझे ए.टी.एम. टाकून बॅलन्स चेक कर मिनी विवरण काढ असे सांगत त्यावेळी तो ए.टी.एम.पिन नंबर पाहून तेच कार्ड लांबवत असे व त्यातून जितके रोख पैसे काढता येतील तितके काढत असे व बाकी सोने-चांदी, मोबाईल, महागडी शॉपिंग करून घेत असे व परत काही दिवसांनी हेच सोने त्याच दुकानदाराला विकून रोख पैसे घेत असे किंवा गहाण ठेवत असे व उत्तर प्रदेशा तील त्याच्या कुटुंबाला पैसे दुसऱ्याच्या मोबाईलद्वारे ट्रान्सफर करत असे व त्या बदल्यात त्यांना जास्त पैसे पण द्यायचा. याचबरोबर देशातील सुरत,अहमदाबाद,विजयवाडा,दिल्ली, चेन्नई,भोपाळ, इंदोर,अशा विविध शहरात तो प्रवास करीत असतांना त्या काळात तो बॅगा मोबाईल,रेल्वे प्रवासात लांबवत असे,असे कारनामे त्याचे होते अमळनेर शहरात त्याने २० ते २५ मोबाईल चोरी केलेले विकले आहेत. तसेच अमळनेर रिक्षा चालकांशी पण त्याची सलगी होती. केवळ अमळनेर शहर सोडून तो सर्व ठिकाणी हातसफाई(चोरी) करायचा त्यामुळे तो या ठिकाणी सुरक्षित वावरत असे. असाच एक गुन्हा त्याने मध्य प्रदेशातील इटारसी येथे केला होता त्यामुळे त्याला इटारसी रेल्वे पोलीसांनी १० ऑक्टोबर रोजी अमळनेर शहरातून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला इटारसी रेल्वे पोलिसांनी अमळनेर पोलीस ठाण्यात नेले. इटारसी पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला आणि या ठिकाणी त्याने एका अमलनेरच्या सोनाराकडे सोन्याची चैन गहाण ठेवली होती. यावेळी त्याने केलेल्या कृत्यांची कबुली पण दिली आहे. यावेळी त्याने केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पण त्याचे पोलिसांना मिळाले आहेत त्यात तो आढळून आला ही कारवाई इटारसी रेल्वे पोलीस निरीक्षक बी.एस. चोहान, ए.एस.आय.श्री लाल पडरिया, पोलीस कर्मचारी कृष्णकुमार यादव, अमित तंवर, सुमीत यादव,राहुल यादव,यांनी त्याला पकडले याबाबत इटारसी रेल्वे पोलिसात भा.द.वि. कलम ३७९, ३८०,४२० प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

संशयास्पद व्यक्तींना आश्रय देणाऱ्यांची गय नाहीअमळनेर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर
अमलनेरातील जनतेने अनोळखी व्यक्तींना घरे,दुकाने भाड्याने देऊ नये,व अश्या संशयास्पद महीला, पुरुषांना आश्रय देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ अमळनेर पोलिस स्टेशन ०२५८७-२२३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *