खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

गोरगरीबांच्या उद्धाराचाच कळवळा, भाऊ समाजसेवेचा फुलवताय मळा

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) समाज सेवा करीत असताना कोणतीही वेळ आणि काळ नसतो म्हणूनच कोणीही, केव्हाही मदतीसाठा आवज दिल्यास महेंद्र सुदाम महाजन यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच एखाद्या गोरगरीबाचे आयुष्य आपण बदलू शकतो आणि तेच आपलं स्वप्न असल्याचे महेंद्र भाऊ सांगतात. गोरगरीबांच्या उद्धाराचाच त्यांना आधीपासूनच कळवळा असल्याने त्यांनी अनेकांना मदतीचा हात देऊन समाजसेवेचा मळा फुलवला आहे.
महेंद्र महाजन यांचे शिक्षण एमएपर्यंत झाले असून त्यांना सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड आहे. ते सांगतात, सामाजिक कार्य मागील १५ ते २० वर्षापासून करीत आहे. त्या अगोदर गरीब लोकांच्या सहकार्यासाठी त्यांचे पाठबळ म्हणून मी उभा असतो. आई हे माझे प्रेरणास्थान आहे. समाजसेवा करणे व गोरगरिबांसाठी नेहमी खंबीरपणे उभे राहणे हेच माझे कार्य राहणार आहे. सुरुवातीला सामाजिक कार्यासाठी मेडिकलवर काम केले. हे काम करता करता पुढे चहाची हॉटेल झाली. नंतर शेती व्यवसाय डेव्हल्प केला. शुद्ध शाकाहारी भोजनालय सुरू केले. या सर्व कामांना सांभाळून मी सामाजिक कार्य करत आहे. हे सामाजिक काम म्हणून व्यवसाय सांभाळत असतानाच मला परिवाराची मोठी मदत झाली आहे. कुटुंबात आई, पत्नी, दोन भाऊ एक मुलगा, दोन मुली आहे. ते सर्व नेहमीच सहकार्य करीत असतात. माझ्या सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे मोलाचे सहकार्य राहिलेले आहे. आयुष्यात गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून जाण्याचा प्रयत्न असतो. कोरोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी दोन रग्णवाहिका , औषधी, त्यांनंतर शिबिर घेऊन जनजागृती केली. २५ जणांना रेमडीशियर उपलब्ध करून दिले. लॉकडानमध्ये लोकांचे हाल होत असताना त्यांना भाजीपाला आणि किराणा माल घरपोच केला आहे. नेहमी समाजात माणुसकी म्हणून सतत लोकांच्या मदतीला धावून येणारे समाजसेवक म्हत्वाचे असतात. त्यांची भूमिका खूप महत्वाची असते. ज्या एखाद्या गोरगरीबाचे आयुष्य आपण बदलू शकतो आणि तेच माझं स्वप्न आहे.

Live

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button