संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते पुण्याला जाणार

संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी दिली अधिवेशनाची माहिती

अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात २८ डिसेंबर रोजी होणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनसाठी अमळनेर शहरासह जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील व अमळनेर तालुका अध्यक्ष किरण पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा.श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह. साळुंखे, प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.मा. म. देशमुख, डॉ.जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव, प्रसिध्द अभिनेते भरत जाधव, सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे, इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजराजे भोसले, आदि मान्यवर या रौप्यमहोत्सवी अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनात विविध महत्त्वपुर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *